IMPIMP

CM Eknath Shinde | आधी पक्षप्रमुख उल्लेख टाळला, आता थेट ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करत एकनाथ शिंदे म्हणाले…

by nagesh
Vinayak Raut | shivsena vinayak raut slams bjp over political situation

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी (Shiv Sena Rebel MLA) केली. आधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांवर आरोप करण्यात आले. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) हे बंडखोर नेत्यांच्या निशाण्यावर होते. राऊतांवर टीका करताना ठाकरे कुटुंबाविषयी (Thackeray Family) आदर असल्याचा दावा केला जात होता. मात्र, आता थेट ठाकरे कुटुंबालाच लक्ष्य केले जात आहे. मख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena Party Chief) उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री (Former Chief Minister) असा केला. आता राज्यातील काही ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल (Gram Panchayat Election Result) लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करत ट्विट केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ट्विटमध्ये म्हटले की, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजप युती सरकारला (Shiv Sena-BJP Alliance Government) जनतेचा कौल मिळाला आहे. शिवसेना-भाजप युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन, तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारराजाचेही अभिनंदन व आभार.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटमध्ये एक पोस्टर आहे. या पोस्टरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांचे फोटो आहेत.
तसेच जनतेचा कौल म्हणत राज्यातील 271 ग्रामपंचायतींच्या निकालाची आकडेवारी मांडण्यात आली आहे.
यातच एकनाथ शिंदेंनी ‘उद्धव ठाकरे गट’ (Uddhav Thackeray Group) असा उल्लेख केला आहे.
यानुसार ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला 82, शिवेसना 40, उद्धव ठाकरे गट 27, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) 53,
काँग्रेस (Congress) 22 आणि इतरांना 47 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाल्याचे म्हटले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- CM Eknath Shinde | eknath shinde tweet on election mentioning uddhav thackeray group

हे देखील वाचा :

Bhandara Crime | महाराष्ट्र पुन्हा हादरला! दिल्लीतील निर्भयाकांडायापेक्षा भयंकर घटना

Aslam Sheikh | फडणवीसांच्या भेटीनंतर स्टुडिओ घोटाळाप्रकरणी अस्लम शेख यांना नोटीस, भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम?

Punit Balan Group | ‘खो-खो खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविणार’ – पुनीत बालन

Related Posts