IMPIMP

CM Eknath Shinde | शिवसेनेच्या 2 आमदारांना लागली लॉटरी, बंडखोरीनंतर मंत्रिपद

by nagesh
CM Eknath Shinde | uddhav thackeray is aggressive after cm eknath shinde started making phone calls to register the members of balasahebanchi shivsena

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन  CM Eknath Shinde | शिवसेनेत (Shivsena) असताना मंत्रीपदाची संधी हुकलेल्या दोन नवीन चेहर्‍यांना शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात (Shinde-Fadnavis Government Cabinet) स्थान देण्यात आले आहे. तानाजी सावंत आणि दिपक केसरकर (Tanaji Sawant and Deepak Kesarkar) यांना शिंदे गटाकडून पहिल्या यादीत स्थान देण्यात आले आहे. राज्याच्या मंत्रीमंडळातील नव्या नावांची यादी समोर आली आहे. शिंदे गटाकडून (CM Eknath Shinde Group) सावंत आणि केसरकर यांना संधी देण्यात आली आहे. (CM Eknath Shinde)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तानाजी सावंत हे बंडखोरीमध्ये पहिल्या फळीतील नेते होते. आपली नाराजी त्यांनी जाहीरपणे सभांमध्ये बोलून दाखवली होती. तसेच, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) शपथविधी सोहळ्यात ऐनवेळी त्यांचे नाव कापल्याने ते नाराज होते. तर, दुसरीकडे दीपक केसरकर यांनाही मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने तेही शिवसेना नेतृत्त्वावर नाराज होते. या दोघांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पहिल्या टप्प्यात मंत्रिपद देऊन खुश केले आहे.

मागील सरकारमध्ये गृह राज्यमंत्री (Minister of State for Home) असूनही केसरकर यांना मविआमध्ये संधी दिली नव्हती. अखेर बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाकडून या 2 आमदारांना मंत्री बनविण्यात आले आहे. शिंदे गटाकडून 9 जणांना मंत्रीपद (Ministership) देण्यात आले आहे. (CM Eknath Shinde)

शिंदे गटाकडून पहिल्या टप्प्यात यांना संधी

1. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)

2. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)

3. तानाजी सावंत

4. दीपक केसरकर

5. संदीपान भुमरे (Sandipan Bhumre)

6. अब्दुल सत्तार (Abdul Sattar)

7. दादा भुसे (Dada Bhuse)

8. उदय सामंत (Uday Samant)

9. संजय राठोड (Sanjay Rathod)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भाजपाकडून (BJP) पहिल्या टप्प्यात यांना संधी

1. गिरीश महाजन (Girish Mahajan)

2. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)

3. मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha)

4. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)

5. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)

6. सुरेश खाडे (Suresh Khade)

7. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)

8. अतुल सावे (Atul Save)

9. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)

Web Title :- CM Eknath Shinde | eknath shinde two shiv sena mlas get lottery shinde faction gets ministerial post after rebellion

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | ‘… तो पर्यंत संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये राहणार’, किरीट सोमय्यांचे मोठं भाकीत (व्हिडिओ)

China Mobiles | ’12 हजारपेक्षा कमी किमतीचे मोबाईल भारतात विकू शकणार नाही चीन’ – रिपोर्ट

Pune NCP | विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात घरातून प्रोत्साहन दिले पाहिजे – दिलीप वळसे पाटील

Related Posts