IMPIMP

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॅमेज कंट्रोल मोडवर?; प्रतापगडावर शिवप्रताप दिनानिमित्त म्हणाले – ‘जर राज्यात परिवर्तन झालं नसतं, तर…’

by nagesh
CM Eknath Shinde | had there not been a change today would not have the enthusiasm says eknath shinde on pratapgad for shivpratap din

सातारा : सरकारसत्ता ऑनलाईन    CM Eknath Shinde | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी
छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त केलेल्या विधानामुळे सुरू झालेला वाद काही संपताना दिसत नाही. संपूर्ण महाराष्ट्र राज्यपालांच्या राजीनाम्याची
मागणी करत आहे. परंतु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) डॅमेज कंट्रोल मोडवर काम करताना दिसत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आज प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा केला जात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले, “आपण आज 363 वा शिवप्रताप दिन साजरा करत आहोत. जर राज्यात परिवर्तन झालं नसतं, तर आज शिवप्रताप दिनाला उत्साह दिसून आला नसता. प्रतापगडावरील अतिक्रमण निघालं पाहिजे, ही अनेकांची मागणी होती. नियमाने व कायद्याने काम करण्याचे धाडस दाखवत नव्हते, पण ते अतिक्रमण काढून टाकायचा निर्णय झाला. मात्र, शिवरायांच्या पुण्याईने सगळ्या गोष्टी घडल्या आहेत.” याच महिन्यात सातारा जिल्हा प्रशासनाने अफझल खानाच्या कबरीजवळचे अतिक्रमण हटवले. त्याच्या उद्दात्तीकरणासाठी कबरीजवळ बांधकाम झाले होते. सदर बांधकाम शिंदे फडणवीस सरकारच्या आदेशानंतर पाडण्यात आले. ते त्या संदर्भात बोलत होते. यासाठी त्यांनीही पोलिसांचेही आभार मानले.

शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याचे वचन देत एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “एक आदर्श राजा म्हणून शिवरायांकडे जग पाहते. शिवप्रताप दिनाला उपस्थित राहणे यापेक्षा मोठा सन्मान माझ्यासाठी नाही. अनेक जलदुर्ग महाराजांनी उभे केले. छत्रपती शिवरायांना (भारतीय) आरमाराचे जनक मानले जाते. त्यामुळे मोदींनी नौसेनेच्या झेंड्यात महाराजांच्या राजमुद्रेचा वापर केला. आपण त्यांचे मावळे आहोत, हे सांगायला मला अभिमान वाटतो. आपले गडकोट इतिहासाची साक्ष देणारे आहेत. दुर्ग प्राधिकरण स्थापन करून गडांचे संवर्धन करू, कोठेही पैसे कमी पडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, तसेच अतिक्रमणं हटवली जातील.”

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुढे स्वतःच्या सरकारच्या कामाचे कौतुक करत मुख्यमंत्री म्हणाले,” माझी एकही कॅबिनेट बैठक अशी झाली नाही,
ज्यामध्ये सर्वसामान्यांचा निर्णय झाला नाही. हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे.
एक सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्या सगळ्यांच्या आशीवार्दाने मुख्यमंत्री झाला.”
या वर्षी अफझल खानच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवल्याने मुख्यमंत्री स्वतः प्रतापगडावरील शिवप्रताप
दिन साजरा करण्यास उपस्थित राहिले होते. पण राज्यपालांच्या वक्तव्याबद्दल नाराजी दाखवण्यासाठी
शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले मात्र अनुपस्थित राहिले. एकनाथ शिंदे राज्यपालांचा
विषय टाळत असून, शिवाजी महाराजांसाठी त्यांचे सरकार काय करत आहे आणि काय करणार आहे,
याची आठवण सर्वांना करून देत आहेत.

Web Title :- CM Eknath Shinde | had there not been a change today would not have the enthusiasm says eknath shinde on pratapgad for shivpratap din

हे देखील वाचा :

Pune Crime | गोळीबार झाल्याचा बनाव करुन व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; 80 लाख रुपये खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारावर गुन्हे शाखेकडून FIR

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल; म्हणाले – ‘मी विचारलेले प्रश्न…’

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप संघाचा विजयाचा चौकार; ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा पहिला विजय

Related Posts