IMPIMP

CM Eknath Shinde | ‘ज्यांनी आठ महिने आमच्या लोकांचा अपमान केला त्याचं काय?’, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल (व्हिडिओ)

by nagesh
 CM Eknath Shinde | is it right to call cm a traitor eknath shinde raised voice in maharashtra assembly

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – विधिमंडळाच्या (Legislature) आवारात गुरुवारी (दि.23) सत्ताधारी आमदारांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांच्या फोटोला जोडे मारुन आंदोलन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर (Savantryan Veer Savarkar) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सत्ताधाऱ्यांनी हे आंदोलन केले. विधीमंडळाच्या आवारात अशा प्रकारचे आंदोलन अशोभनीय असल्याचे म्हणत काँग्रेसने कारवाईची मागणी केली होती. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांनी माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आक्षेप घेतला. ज्यांनी ज्यांनी गेले आठ महिने आमच्या लोकांचा अपमान केला त्याचं काय? असा सवाल एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उपस्थित करत कारवाई करायची असेल तर सर्वांवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधीमंडळात निवेदन सादर केले. तुम्ही जर आमच्या पंतप्रधानांचा अपमान करणार असाल तर या देशातील जनता आणि आम्ही सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सदनाचा मान सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे. बोलताना सर्वांनी तारतम्य बाळगलं पाहिजे असेही एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

आमच्या लोकांचा अपमान केला त्याचं काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) त्यांच्या आईचा अंत्यविधी झाल्यावर लगेच कर्तव्यावर गेले त्यांना तुम्ही चोर म्हणता. राष्ट्रभक्ती, देशभक्ती त्यांच्या नसानसात आहे, त्यांचा तुम्ही अपमान करता, हे बिलकुल चालणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ज्यांनी ज्यांनी गेले आठ महिने आमच्या लोकांचा अपमान केला त्याचं काय? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. कारवाई करायची असेल तर सर्वांवर झाली पाहिजे असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

हे कुठल्या आचारसंहितेत बसतं?

शिंदे पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना खोके म्हणणं, मिंधे म्हणणं, चोर किंवा गद्दार म्हणणं हे कुठल्या आचारसंहितेत बसतं नाना? असा सवाल त्यांनी काँग्रेस आमदार नाना पटोले (MLA Nana Patole) यांना केला. आम्ही जोडे मारण्याचं समर्थन केलं नाही. करणारही नाही. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करणं हे देशद्रोहाचं काम आहे. सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भारत जोडो यात्रा कशी काढली?

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही.
या देशाचा मान आणि देशाची कीर्ती जगभरात पोहोचवण्याचं काम पंतप्रधानांनी केले आहे.
ज्या जी-20 (G-20) चं अध्यक्षपद आपल्याला मिळालं.
त्या जी-20 मध्ये राहुल गांधी म्हणाले या देशामध्ये लोकशाही नाही.
जर देशातील लोकशाही धोक्यात असेल तर भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) कशी काढली?
जम्मू काश्मीरमध्ये झेंडा फडकावला ना? असे प्रश्न एकनाथ शिंदे यांनी काँग्रेला विचारले.
इंदिरा गांधी (Indira Gandhi) या पंतप्रधान होत्या.
त्यांचाही आम्ही अभिमान बाळगतो, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Web Title :- CM Eknath Shinde | is it right to call cm a traitor eknath shinde raised voice in maharashtra assembly

हे देखील वाचा :

Akshay Kumar | चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अक्षय कुमारला झाली दुखापत

Congress MP Rahul Gandhi | वादग्रस्त विधान करणं राहुल गांधीना पडलं महागात, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

Baramati NCP MP Supriya Sule | ‘वयोश्री’ आणि ‘एडीप’ योजनेअंतर्गत सहाय्यभूत साधनांच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध व्हावा; बारामती लोकसभा मतदार संघातील लाभार्थ्यांसाठी खा. सुळे यांची केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा

Related Posts