IMPIMP

CM Eknath Shinde | ‘मुंबादेवी’ परिसराचा पुनर्विकास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

by nagesh
CM Eknath Shinde | 'Mumbadevi' area will be redeveloped: Chief Minister Eknath Shinde

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – CM Eknath Shinde | श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या (Shri Kashi Vishwanath Temple) धर्तीवर मुंबादेवी मंदिर (Mumbadevi Temple) परिसराचा पुनर्विकास करणार आहे. त्यासाठी मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काळबादेवी येथील मुंबादेवीचे दर्शन घेऊन या परिसराची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर (Assembly Speaker Adv. Rahul Narvekar), महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Women and Child Development Minister Mangal Prabhat Lodha), आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar), माजी मंत्री डॉ. दीपक सावंत (Deepak Sawant), माजी मंत्री राज के. पुरोहित व माजी नगरसेवक आकाश पुरोहित, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारासु (Additional Municipal Commissioner P. Velarasu) आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, मुंबादेवी प्राचीन मंदिर असून याप्रती सर्वांनाच श्रद्धा, आस्था आणि प्रेम आहे.
मुंबादेवी मंदिर परिसरात अनेक भक्तगण भेट देत असतात.
श्री काशी विश्वनाथ मंदिर व उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर (Sri Mahakaleshwar Temple Corridor), तिरूपती देवस्थानाच्या (Tirupati Temple) धर्तीवर विकास करण्यात यावा अशी मागणी मुंबईकरांची आहे. या परिसरात अत्यावश्यक असणाऱ्या सोयी सुविधा लक्षात घेऊन त्या ठिकाणी दर्शन रांगा, वाहनतळ आणि आवश्यक असणाऱ्या सुविधांच्या विकासाबाबत शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल.

Web Title :- CM Eknath Shinde | ‘Mumbadevi’ area will be redeveloped: Chief Minister Eknath Shinde

हे देखील वाचा :

Pune Crime News | 22 लाखाच्या फसवणूक प्रकरणी नितीन गोते, रोहित गोते, तुषार खेडेकर, राहुल मोरबाळे, मिथुन हारगुडेविरूध्द गुन्हा दाखल

Pune Crime News | सन 2011 पासून ठेवले शारिरीक संबंध, मुलगी झाल्यानंतर देखील आजतागायत केलं नाही लग्न

NCP MLA Amol Mitkari | ‘अन् तथाकथित ‘हिंदु जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले, त्यामुळे…’, अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

Pune Crime News | मुंढव्यात 16 वर्षीय मुलीला ब्लॅकमेल करून बलात्कार, 20 वर्षीय युवकास अटक

Related Posts