IMPIMP

CM Eknath Shinde | नगराध्यक्ष, सरपंच निवड थेट जनतेतून ही जनतेचीच मागणी, आमचा अजेंडा नाही; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

by nagesh
CM Eknath Shinde | i am balasaheb thackeray s shiv sainik one battle won we will win again eknath shinde spacial maharashtra bmc elections

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन नगराध्यक्ष (Mayor) आणि सरपंचाची (Sarpanch) निवड ही थेट जनतेतून करावी अशी मागणी जनतेचीच होती, तो आमचा अजेंडा नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्पष्ट केलं. विधानसभेत (Legislative Assembly) विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवसाचे कामकाज आज सुरु होते. यावेळी महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत औद्योगिक नगरी पंचायत विधेयक 2022 संमत करावं अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. ते विधेयक बहुमताने मंजूर केलं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तो एका मंत्र्याचा निर्णय नसतो
नगराध्यक्ष आणि सरपंचाची निवड थेट जनतेतून करता, मग मुख्यमंत्र्यांचीही निवड जनतेतून करा असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला होता. याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, थेट नगराध्यक्ष करावा हा निर्णय 2006 साली घेतला. असे निर्णय आताच आपण बदलला असे नाही. नगरविकास मंत्र्याने निर्णय घेतला, तो एका मंत्र्याचा निर्णय नसतो तो सर्व मंत्र्यांचा असतो. एखादा गुंड एखाद्या वार्डात पैशाच्या जोरावर निवडून येऊ शकतो, मात्र पूर्ण शहरात पैशाच्या जीवावर तो निवडून येऊ शकत नाही. मग मुख्यमंत्र्यांची जनतेतून निवड कशी करायची, घटनेत (Constitution) बदल करायचा का? असा सवाल करत आमचं सरकार घटनेनुसारच काम करतं, असे शिंदे यांनी सांगितले.

आम्ही आमचा अजेंडा राबवत नाही
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने (Maharashtra State Council of Sarpanch) केली होती. ती मागणी आम्ही मान्य केली. आम्ही जनतेच्या मागण्यांवर काम करतोय, आम्ही आमचा अजेंडा राबवत नाही. जनतेच्या इच्छे नुसार आम्ही काम करतो.

देवेंद्रजी और मै…
आपण सगळ्या गोष्टी विचारांमध्ये घेऊन निर्णय घेतला. बरेच जण म्हणाले, कुणाच्या आग्रहाखातर निर्णय घेतला, खांद्यावर बंदूक ठेवून निर्णय घेतला. पण, असं काही नाही. जे जनता म्हणणार तेच आम्ही करणार. मी निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. ‘देवेंद्रजी और मैं हूं साथ साथ… मेरा नाम भी है एकनाथ’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मी सक्षम नसतो तर..
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधक म्हणतात की मी सक्षम नाही.
मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का? करेक्ट कार्यक्रम केला का नाही.
जयंतराव (Jayant Patil) मला भेटले आणि म्हणले असं कसं झालं? कुणी खांद्यावर बंदुक ठेवली, हे सगळं दादांना माहिती आहे.
दादा मला म्हणले तू कधी सांगितले असते तर कानात सांगितले असते. पण दादा ते तुमचं ऐकत होते.
आमचं ऐकत नव्हते, तोच तर प्रॉब्लेम होता, तिथेच प्रॉब्लेम झाला आणि सगळ्या गोष्टी घडल्या,
असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) अप्रत्यक्ष लगावला.

Web Title :- CM Eknath Shinde | now the mayor will be elected from the people bill approved in vidhan sabha cm eknath shinde

हे देखील वाचा :

Mohit Kamboj-Rohit Pawar | ट्विट करत मोहित कंबोज म्हणाले – ‘बारामती अ‍ॅग्रो कंपनीचा…’

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे- उद्धव ठाकरे एकत्र येणार? मनसेच्या बैठकीत काय ठरलं? बाळा नांदगावकर म्हणाले…

Eknath Shinde vs Ajit Pawar | विरोधकांची शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी; म्हणाले – ‘खाऊन खाऊन 50 खोके, माजलेत बोके माजलेत बोके…‘

Related Posts