IMPIMP

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांचे विचार मोडूनतोडून टाकणाऱ्यांना…’; उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंच्या प्रत्युत्तर

by nagesh
CM Eknath Shinde | shivsena saamana editorial chhatrapati sambhaji maharaj statement abou ajit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते
सुधांशु त्रिवेदींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा महाराष्ट्राच्या दैवताचा
अपमान आहे, असे म्हणतं विरोधी पक्षाने शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका सुरु ठेवली आहे. आजच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी या विषयी
वक्तव्य केले. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही (CM Eknath Shinde) उद्धव ठाकरेंच्या
टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. (CM Eknath Shinde On Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. यासंबंधी, यापूर्वीही मी माझं मत मांडलेलं आहे. गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार बाळासाहेबांच्या विचाराची काम करतय, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, धडकी भरली आहे की आता पुढे काय होणार? आणि (विरोधी पक्षाचे) सगळे जे काय प्रकार आहेत, ते त्यातूनच पुढे येत आहेत.”

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

“छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार कुणाला आहे? बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांचे विचार मोडूनतोडून टाकणाऱ्यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे का? सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार मोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले आणि तडजोड केली. यांनी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही.” अशी टीका एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली.

Web Title :- CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | chief minister shindes response to uddhav thackerays criticism

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray On Maharashtra Karnataka Border Issue | ‘मुख्यमंत्री म्हणतील 40 गाव कर्नाटकाला जाऊ द्या, आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यावर 100 गाव महाराष्ट्रात घेऊ’; ठाकरेंनी घेतली शिंदेंची फिरकी

Pune ACB Trap | दोन लाखाची लाच मागणाऱ्या पुण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर अँन्टी करप्शनकडून FIR

Pune Crime | वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला बारामती सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाची विजयी सलामी; द गेम चेंजर्स संघाचा सलग दुसरा विजय

Related Posts