IMPIMP

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला ‘दे धक्का’, राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हाध्यक्षाचा ई-मेलवरुन राजीनामा

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar call cm eknath shinde over jitendra awhad fir molestation

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेला (Shivsena) धक्का दिल्यानंतर आता आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) वळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष (Thane District Rural President) सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा (Suresh Mhatre aka Balya Mama) यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा आज (मंगळवार) राजीनामा (Resignation) दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे म्हात्रे यांनी आपला राजीनामा ई-मेलद्वारे पाठवला आहे. म्हात्रे यांच्या राजीनाम्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाचा सगळ्यात मोठा फटका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ठाण्यात बसला आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसेना एकनाथ शिंदे यांनी जवळपास आपल्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केल्याची चर्चा सुरु झाली आहे. सुरेश म्हात्रे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीला ठाण्यात मोठा धक्का बसला आहे.

सुरेश म्हात्रे यांनी आपला राजीनामा ई-मेलद्वारे पाठवला आहे.
त्यांच्या राजीनाम्याने ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी हानी होणार आहे.
आपण आपल्या वैयक्तिक कारणाने जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हात्रे यांनी राजीनाम्यात म्हटले आहे.
म्हात्रे हे प्रथम शिवसेनेत होते. त्यानंतर ते मनसे (MNS), भाजप (BJP), पुन्हा शिवसेनेत गेले.
त्यानंतर आता राष्ट्रवादीत गेले होते. परंतु तिथेही राजीनामा दिल्याने ते आता शिंदे गटात (Shinde Group)
जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- CM Eknath Shinde | set back for ncp in thane district suresh mhatre resigns from party likely to join shinde camp

हे देखील वाचा :

Shivsena | धनुष्यबाण कुणाला मिळणार सेना की शिंदे गट? निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिली ही डेडलाईन

Pune Crime | महिलांच्या लैंगिक छळवणूक प्रकरणात Coca-Cola कंपनीने घेतलेला ‘तो’ निर्णय औद्योगिक न्यायालयाकडून कायम, याचिकाकर्त्याचा अर्ज फेटाळला

Shahaji Bapu Patil | अजित पवारांना वाटतं आपण पुन्हा पहाटे शपथ घेऊ पण…, अजित पवारांना शहाजी बापू पाटलांचा टोला

Related Posts