IMPIMP

CM Eknath Shinde | ‘विनायक मेटेंचं बलिदान वाया जाऊन देणार नाही’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

by nagesh
CM Eknath Shinde | shivsangram vinayak mete cremated with state honours in beed cm eknath shinde said

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन CM Eknath Shinde | शिवसंग्राम पक्षाचे नेते (Shiv Sangram President) विनायक मेटे (Vinayak Mete
Death) यांचा काल पुणे-मुंबई हायवेवर (Pune-Mumbai Express Highway) अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच पार्थिव काल दुपारी वडाळा
येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच पार्थिव राजेगाव मध्ये आणण्यात आलं. आज (सोमवार) दुपारी पावणे पाच वाजता त्यांच्या
पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी मानवंदना देत शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विनायक मेटे यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असे सांगितले.

अंत्यसंस्कारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat), भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde), राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (NCP Leader Dhananjay Munde), कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar), माजी मंत्री अर्जुन खोतकर (Former Minister Arjun Khotkar), माजी मंत्री राजेश टोपे (Former Minister Rajesh Tope), खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा दिला.
त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करु. वाट्टेल ते करावं लागलं तरी चालेल पण मेटे यांचं स्वप्न पूर्ण करु,
असं असतानाच सध्या मराठा समाजाला जे जे काही द्यायचं आहे.
त्या गोष्टी आम्ही पूर्ण करणार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच मेटे यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही.
मराठा समाजासाठी जे जे करावं लागेल ते करु, हा आमच्या सरकारचा शब्द आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Web Title : –  CM Eknath Shinde | shivsangram vinayak mete cremated with state honours in beed cm eknath shinde said

हे देखील वाचा :

OLA Electric Car | Independence Day ला OLA चा डबल धमाका, इलेक्ट्रिक कारची घोषणा, 4 सेकंदात पकडणार 100 चा वेग

Vinayak Mete Death | विनायक मेटेंच्या डॉक्टर पत्नीचा मृत्यूवर संशय, म्हणाल्या…

CM Eknath Shinde | मलईदार खाती भाजपकडे, खातेवाटपावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

Related Posts