IMPIMP

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘आव्हान अंगावर घेण्याची वेळ आली की नेहमी मलाच…’

by nagesh
CM Eknath Shinde Group | 3 more MPs and 8 MLAs of Shiv Sena will go to Shinde group?

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन नाशिक विभागीय कार्यालयाच्या (Nashik Divisional Office) आवारात सारथीच्या नाशिक विभागीय
कार्यालयाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शिंदे यांनी पुन्हा एकदा नाव न घेता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. परिस्थिती अंगावर घेण्याची वेळ आली की नेहमी मलाच पुढे केले जात होते, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचा प्रसंग सांगितला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी खासदार संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati), पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse), खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांच्यासह विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakrishna Game), आमदार दिलीप बनकर (Dilip Bunkar), सीमा हिरे, अ‍ॅड. राहुल ढिकले. देवयानी फरांदे, नरेंद्र दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर (B. G. Shekhar), जिल्हाधिकारी डी गंगाथरण, आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल इत्यादी उपस्थित होते.

यावेळी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजी राजे छत्रपती आझाद मैदानावर बसले होते. तेव्हा सर्वांचीच धावपळ उडाली आणि अशावेळी आव्हान अंगावर घेण्याची वेळ आल्यामुळे मला पुढे करण्यात आले. आव्हान अंगावर घेण्याची वेळ आली की नेहमी मलाच पुढे केले जात होते. अशीच आव्हाने अंगावर घेण्याच्या धाडसामुळे राज्यात नवीन सरकार आले.

शिंदे म्हणाले, राज्यात सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे.
राज्याचे प्राधान्यक्रम शिक्षण, आरोग्य, कृषी, शेतकरी विकास आहे. राज्यातील मराठा, कुणबी मराठा, कुणबी,
आणि मराठा कुणबी समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी सारथीचे काम सुरू आहे.

मध्यंतरी दोन तीन वर्षाच्या कालावधीत हे काम थांबले असले तरी आता समाजातील दीनदुबळ्यांसाठी, वंचितांसाठी, शोषितांसाठी त्यांच्या कल्याणासाठी,
मराठा तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी सारथीचे काम पुन्हा रुळावर आणण्यासाठी हवी ती मदत आणि निधी उपलब्ध करून देऊ, असे शिंदे म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी उप समितीच्या माध्यमातून आवश्यक ती पूर्तता करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

संभाजी राजे छत्रपती म्हणाले, नाशिक विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनामुळे सरकारडून अपेक्षित काम होत आहे.
मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे यासाठी सर्वोच्च न्यायालयात मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करावे लागेल.
त्यासाठी राज्य सरकारने पुन्हा सर्वेक्षण करण्याची तसेच सारथीचे काम ग्रामीण भागातही पोहचवले पाहिजे.

Web Title :- CM Eknath Shinde | the new government in the state is due to the courage to take up the challenge eknath-shinde

हे देखील वाचा :

Parbhani News | परभणीत महिलाराज ! जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, महानगरपालिकेच्या आयुक्त आणि जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदांवर महिला

Pune PMC News | ड्रेनेज लाईन पावसाळी गटारांना जोडण्यात आल्याने ‘महेश सोसायटी’ चौकात मैलापाणी रस्त्यावर

Thane Crime | ठाणे शहरात एका दिवसात दोन गोळीबार; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर?

Related Posts