IMPIMP

CM Eknath Shinde | पन्नास खोक्यांचा हिशोब देणार, मुख्यमत्र्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

by nagesh
CM Eknath Shinde | uddhav thackeray is aggressive after cm eknath shinde started making phone calls to register the members of balasahebanchi shivsena

पैठण : सरकारसत्ता ऑनलाइन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज औरंगाबाद (Aurangabad) आणि पैठणच्या (Paithan) दौऱ्यावर आहेत. मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या मतदारसंघामध्ये झालेल्या जाहीर सभेत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण करुन दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) विचारांना मानणारे लोक इथे जमले आहेत. त्यांच्या विचारांना पसंती देणारी ही पैठणमधील गर्दी आहे. आमची लढाई सोपी नव्हती, सर्वचजण आमचा कार्यक्रम करायला टपले होते. पण, आमचे 50 लोक ठाकरे गटाला (Thackeray Group) आणि महाविकास आघाडीला पुरून उरले. आम्ही सत्तेतून पायउतार झालो, ते बाळासाहेबांच्या विचारांसाठी. जनतेने युतीला सत्तेत आणले होते, परंतु यांनी विरोधकांसोबत हातमिळवणी केली.

50 खोक्यांचा हिशोब देणार
जे करायला नको होते ते त्यांनी केले. मतदार आणि हिंदुत्वाशी (Hindutva) गद्दारी, विश्वासघात कोणी केला हे लोकांना माहित आहे.
राज्य सामान्यांचे आहे. या राज्यात सर्व सामान्यांना न्याय देण्याचे काम आम्ही करत आहोत.
शेतकऱ्यांना नुकसानीसाठी भरघोस निधी देत आहोत, म्हणून लोकांचे आम्हाला समर्थन आहे.
तुम्ही आमच्यावर पन्नास खोक्यांची टीका करता, पण या खोक्यांचा हिशोब योग्यवेळी देईल, असेही इशारा शिंदे यांनी विरोधकांना दिला.

Web Title :- CM Eknath Shinde | you joined hands with the opposition chief minister eknath shinde slams shivsena

हे देखील वाचा :

Pune Crime | वानवडी येथील पनीर कारखान्यावर FDA चा छापा,800 किलो बनावट पनीर जप्त

Collector Dr. Rajesh Deshmukh | अपघातांची कारणे शोधून उपाययोजनांवर भर द्यावा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Pune Metro Station | मेट्रो स्टेशनच्या कामामुळे डेक्कन जिमखाना बस स्टॉप येथून भिडे पूलावर येणार्‍या वाहनांसाठी उद्यापासून रस्ता बंद

Gyanvapi Mosque Case | ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल, पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला

Related Posts