IMPIMP

CM Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरे आजारी आहेत, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा’; केंद्रात मंत्री असलेल्या भाजपच्या नेत्यानं दिला पर्याय

by nagesh
CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray has called a meeting of shiv sena office bearers and ordered them to start party building work

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन CM Uddhav Thackeray | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे मागील अनेक दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे नुकतंच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनालाही (Maharashtra Winter Session) मुख्यमंत्री ठाकरे उपस्थित नव्हते. अधिवेशनाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती नसल्याने विरोधकांनी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) हल्लाबोल केला. याच मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. अशातच भाजप नेते (BJP) आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रावसाहेब दानवे औरंगाबादमध्ये (Aurangabad News) माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सध्या आजारी आहे. अशात राज्याचा कारभार चालवण्यासाठी कुणीतरी मुखिया हवा आहे. त्यामुळे शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करायला काय हरकत आहे,’ असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. ‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे,’ असा पर्याय रावसाहेब दानवे यांनी सुचवला आहे.

पुढे रावसाहेब दानवे म्हणाले, ‘मुख्यमंत्री आजारी असून ते लवकरात लवकर बरे व्हावेत.
त्यांना लवकर बरे वाटावे, यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र त्यांच्या आजारपणामुळे राज्याला सध्या प्रमुखच नाही.
अशात कुणाला तरी प्रमुख म्हणून नेमायला हवे. शिवसेनेत एकनाथ शिंदे सारखे नेते आहेत,
त्यांना प्रमुख म्हणून नेमायला हवे किंवा राष्ट्रवादीचे नेते सुद्धा आहेत, त्यांनाही प्रमुख म्हणून नेमावे.’ असं ते म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- CM Uddhav Thackeray | bjp leader raosaheb danve suggest uddhav thackeray ill make eknath shinde chief minister

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात पूर्ववैमनस्यातून अपहरण करून एकाचा खून; मोशीमधील धक्कादायक घटना

ST Workers Strike | आतापर्यंत 11008 संपकरी एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन ! 783 जण बडतर्फ तर 2047 जणांना कारणे दाखवा नोटीस

Covid Vaccine Child Registration | 15 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी सुरू झाले आजपासून रजिस्ट्रेशन, Aadhar Card शिवाय सुद्धा करू शकता नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया

Related Posts