IMPIMP

CM Uddhav Thackeray | ‘महाविकास आघाडीतील नेते मला खांद्याला खांदा लावून साथ देतायत’

by nagesh
CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray taunts bjp leaders criticizing mumbai bmc CM said about maha vikas aghadi leader

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – CM Uddhav Thackeray | मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ (WhatsApp Chat Bot) सुविधेच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्या सोहळ्यादरम्यान बोलताना मुख्य़मंत्री ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर वारंवार टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना (BJP) अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. ‘अनेकजण जरासं काही झालं की, महानगरपालिका आणि नगरेसवकांवर खापर फोडतात. सातत्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. पण फक्त प्रश्न विचारायला फार अकलेची गरज नसते, असे मला वाटते. तुम्ही काय करता, हे देखील सांगावे,’ असं ते म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उद्धव ठाकरे म्हणाले, ”अनेकजण निवडणूक मतं मागताना जनतेसमोर झुकलेले असतात.
पण निवडणुका झाल्यावर ते ताठ होतात. महानगरपालिका काम करते म्हणजे लोकांवर उपकार करत नाही.
पण महानगरपालिकेच्या कामाचा आवाका किती मोठा आहे, हेही लोकांनी लक्षात घेतले पाहिजे.
मुंबई महापालिकेचा मोठेपणा केवळ सगळ्यांना दिसतो. पण हीच महापालिका रोज कचरा उचलते, गटारं काढते, पाणीपुरवठाही करते, हेही लक्षात घेतले पाहिजे.
आपली महापालिका तंत्रज्ञानाच्या वापराबाबत देशातील नंबर एकची महापालिका आहे.
मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कामासाठी तिळगुळाची वाट न पाहता कामं करत राहिले पाहिजे.
तरच लोक आपल्याशी गोड बोलतील, गोड वागतील,” असा सल्ला त्यांनी दिला. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांवर नाव न घेता टीकास्त्र सोडलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुढे उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले, ”मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) हा निर्णय माझ्या नेतृत्त्वाखाली झाला, असे म्हणतात.
पण पण माझे साथीदार खंबीर आहेत, खांद्याला खांदा लावून साथ देत आहेत, त्यामुळेच मी हे काम करु शकत आहे.
हे टीमवर्क आहे. तुमच्यासारख्या सहकाऱ्यांमुळेच मी लोकप्रिय मुख्यमंत्री झालो.
महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी साथ दिली नसती तर मुंबई महापालिकेचं जागतिक स्तरावर कौतुक झालंच नसतं.”

Web Title :  CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray taunts bjp leaders criticizing mumbai bmc CM said about maha vikas aghadi leader

हे देखील वाचा :

Coronavirus in Pune | पुणे शहरात कोरोना बाधितांपैकी फक्त 4 टक्के रुग्ण रुग्णालयात

Multibagger Stock | एक लाख गुंतवून कमावले 64 लाख, तुम्ही सुद्धा घरबसल्या करू शकता असे

TCS Share Price | टीसीएसच्या शेयरमधून तुम्ही करू शकता 30% कमाई, निकालानंतर काय म्हणत आहेत एक्सपर्ट

Related Posts