IMPIMP

CM Uddhav Thackeray | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून ज्येष्ठ मंत्र्यांचा काढता पाय; मुख्यमंत्री ठाकरेंची मार्मिक शब्दात टिप्पणी

by nagesh
Maharashtra Political Crisis | andheri east bypoll task uphill for uddhav thackeray faction shivsena in area if symbol is frozen

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन CM Uddhav Thackeray | महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government) काही नेत्यांच्या मागे ईडीच्या कारवाईचे सत्र सुरू आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या मालमत्तेवरही ईडीने (ED) टाच आणल्याने याचे पडसाद विधानसभेत उमटले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईला जशास तसे उत्तर द्यायला पाहिजे, असं अनेक मंत्र्यांनी म्हटलं. दरम्यान त्यावेळी त्याठिकाणी आणखी एका प्रसंगाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

बैठकीच्या सुरुवातीला काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. काही वेळानंतर सर्व अधिकाऱ्यांना बाहेर काढल्यानंतर केंद्रीय यंत्रणांच्या जाचाबाबत चर्चा सुरु झाली. त्यावेळी आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षातील अनेक ज्येष्ठ मंत्री विधिमंडळातील कामाचे निमित्त सांगत बैठकीतून जात असल्याचे दिसत होते. असा प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नजरेत आला. या विषयावरुन मुख्यमंत्री ठाकरे यांनी मार्मिक शब्दात भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ”माझी सगळीकडे चौकस नजर असते. जशास तशी कारवाई व्हावी, पण ती दुसऱ्याकडून व्हावी, असेच साऱ्यांना वाटते,” असे हसत म्हणत मुख्यमंत्र्यांनी मर्मावर बोट ठेवले. दरम्यान ठाकरे यांच्या या विधानामुळे सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, या चर्चेवरुन येत्या काळामध्ये आघाडी सरकारकडून भारतीय जनता पक्षाला (BJP) चोख प्रत्युत्तर दिले जाण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
ते हेच करत राहणार, ”आपण लढत राहायचे.
मी केंद्रातील सत्तेशी दोन हात करूनच हे सरकार आणले आहे.
त्यामुळे या संघर्षाला मी घाबरत नाही,” असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं असल्याचे समजते.
त्याचबरोबर दुसरीकडे ”या सर्व संघर्षात महाविकास आघाडीने भक्कमपणे एकत्र राहिले पाहिजे, मी संघर्षाला तयार आहे.
पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षीय पातळीवर शेंडी तुटो वा पारंबी पण लढाई सोडणार नाही, ही भूमिका घ्यायला हवी,”
असं देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटल्याचं समजते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray taunts mahavikas aghadi senior ministers in cabinet meeting

हे देखील वाचा :

Supreme Court Order To Modi Government | ‘कोरोना’ मृतांच्या कुटुंबियांना 60 दिवसांत मदत द्या, सर्वोच्च न्यायालयाचे मोदी सरकारला आदेश

Shivsena MP Shrirang Barne | ‘राजेश टोपेंची तक्रार उद्धव ठाकरेंकडे करणार’; शिवसेना खासदाराचं वक्तव्य

Weather Update | कोकणात ढगाळ वातावरण तर विदर्भात उकाडा; ‘या’ जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार

Related Posts