IMPIMP

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे आज भूमिपूजन

by bali123
Maharashtra Politics | controversy over balasaheb thackeray painting displeasure of thackeray group mlas over oil painting

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे balasaheb thackeray यांच्या उंचीला साजेसे असे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा निर्धार राज्य शासनाने केला असून बुधवारी (दि. 31) या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. दादर येथील महापौर निवास येथे बुधवारी सायंकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

देसाई म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीबाबतची बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह भूमिपूजन समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे balasaheb thackeray यांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान एका बाजुस तर दुसऱ्या बाजूस अथांग अरबी समुद्र या दोघांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवास या ऐतिहासिक ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. या स्मारकामुळे बाळासाहेबांच्या चाहत्यांची प्रतीक्षा पूर्ण होणार असल्याचे देसाई म्हणाले. स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा मुंबईतील प्रसिध्द वास्तुविशारद श्रीमती आभा लांबा यांनी तयार केला आहे. राज्य शासनाने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली. वास्तू उभारणीचा पहिला टप्पा 14 महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

Also Read:

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले…

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना राज्यात ‘No Entry’ ! ठाकरे सरकार आणणार स्वतंत्र कायदा

…तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही; शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नरेंद्र पाटलांचे वक्तव्य

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

Related Posts