IMPIMP

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान; म्हणाले – ‘ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा’

by nagesh
Maharashtra Political Crisis | decide to form an alliance with bjp today an ultimatum to uddhav thackeray of shinde group maharashtra political crisis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन CM Uddhav Thackeray | महाराष्ट्रात राजकीय वादळ उफाळून निघत आहे. शिवसेना बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जवळपास 40 ते 45 आमदारसहीत गुवाहाटीत आहेत. शिंदे गटाच्या मोठ्या बंडानंतर शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात मोठा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) शिवसेना जिल्हाप्रमुख आणि पदाधिका-यांना संबोधन केलं. यावेळी आज शिवसेना भवनात बैठक घेण्यात आली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी थेट एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान केलं आहे. “आपलं मुख्यमंत्रीपद अमान्य असणं, ही राक्षसी महत्त्वाकांक्षा असल्याची टीका त्यांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे. विठ्ठल आणि बडव्यांवर जे बोलतायेत, त्यांचा मुलगा खासदार असल्याची टीकाही उद्धव यांनी केली आहे. शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना निष्ठा काय असते ते दाखवून द्यावे लागेल.”

“एकनाथ शिंदेंना आपल्याकडची दोन खाती दिल्याचंही उद्धव यांनी सांगितलं आहे. हे सगळं भाजपाने केलं असल्याची टीका त्यांनी केली. त्याचबरोबर त्यांच्यी अग्राहून सुटका करावीच लागेल, असा टोला त्यांनी लागवला आहे. बंडखोरांना जर तिथे भविष्य दिसत असेल तर खुशाल जा, असं म्हणत ठाकरे आणि शिवसेना हे नाव वापरता जगून दाखवा, माझा फोटो न वापरता समाजात वावरुन दाखवा,” असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणाले ते मुद्दे पाहा…

मुख्यमंत्रीपद मान्य नसणे ही राक्षसी महत्त्वाकांक्षा.

ठाकरे आणि शिवसेना हे नाव वापरता जगून दाखवा.

माझा फोटो न वापरता समाजात वावरुन दाखवा.

मी आजारातून बरा होऊ नये म्हणून काहीजण देव पाण्यात घालून बसले होते.

आमदारांना फूस लावून मी सत्ता नाट्य का घडवेन.

मेलो तरी सोडणार नाही म्हणणारे पळून गेले.

कोण कसं वागलं, यात मला जायचं नाही.

जे सोडून गेले त्यांच्याबद्दल वाईट का वाटावं.

एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं, त्यांना नगरविकास खातंही दिलं.

संजय राठोड यांच्यावर वाईट आरोप झाले तरी मी सांभाळले.

झाडाची फुलं न्या, फांद्या न्या, मूळं नेऊ शकत नाही

कोरोनामुळे डोळ्यात पाणी पण ते अश्रू नाहीत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- CM Uddhav Thackeray | live without using the name thackeray and shiv sena uddhav thackerays direct challenge to eknath shinde

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | …म्हणून एकनाथ शिंदे गटाची न्यायालयात धाव

Pune Crime | पुण्यात ओंकारेश्वर घाटावरील दशक्रिया विधी साहित्य पुन्हा चोरीला

Shivsena MP Sanjay Raut | ‘आता वेळ निघून गेलीय, लढाई आम्हीच जिंकणार’; संजय राऊतांचा शिंदे गटाला इशारा

Related Posts