IMPIMP

Coal Import From Russia | भारताने ऐकला नाही अमेरिकन ‘सल्ला’, भारत रशियाकडून खरेदी करणार दुप्पट कुकिंग कोल

by nagesh
Coal Import From Russia | steel minister india planning continued import of russian coking coal

नवी दिल्ली : वृत्त संस्था Coal Import From Russia | रशियाने युक्रेनवर आक्रमण (Russia Ukraine War) केल्यानंतर अमेरिका आणि
पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांना न जुमानता भारत रशियाशी आपले व्यावसायिक संबंध कायम ठेवणार आहे. आता भारताने
रशियाकडून कुकिंग कोळशाची आयात दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती
दिली. (Coal Import From Russia)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलाद मंत्री म्हणाले की, भारत रशियाकडून कुकिंग कोल आयात करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ते म्हणाले की, भारत रशियाकडून कुकिंग कोलची आयात दुप्पट करण्याचा विचार करत आहे.

न्यूज एजन्सी रॉयटर्सनुसार, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, भारताने रशियाकडून 4.5 दशलक्ष टन कोळसा आयात केला आहे. मात्र, ही आयात कधी झाली, याची माहिती पोलाद मंत्र्यांनी दिली नाही. कुकिंग कोलचा वापर पोलाद निर्मिती आणि वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये केला जातो. (Coal Import From Russia)

भारताने रशियाकडून कोळसा आयात करणे यासाठी महत्त्वाचे आहे, कारण पाश्चात्य देश आणि अमेरिका रशियावर सातत्याने निर्बंध लादत आहेत. अमेरिकेनेही भारताला रशियाशी व्यावसायिक संबंध ठेवू नका, असा सल्ला दिला आहे. मात्र, या कठीण काळात भारत आपल्या जुन्या मित्रासोबतचा व्यवसाय सोडणार नसल्याचे भारताच्या भूमिकेवरून स्पष्ट झाले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रशियाने यापूर्वीच भारताला सवलतीच्या दरात कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याची ऑफर दिली आहे. भारत हा रशियाच्या वस्तू आणि शस्त्रास्त्रांचा मोठा आयातदार आहे. रशिया हा साधारणपणे भारताचा कुकिंग आणि थर्मल कोळशाचा सहावा सर्वात मोठा पुरवठादार आहे. निर्बंधांमुळे रशिया भारतीय आणि चीनी खरेदीदारांना अधिक स्पर्धात्मक किमती देऊ शकेल.

काही दिवसांपूर्वी रॉयटर्सने 20 मार्चपर्यंत सुमारे 8,70,000 टन रशियन कोळसा भारतीय किनार्‍यावर पोहोचवला जाईल, असे वृत्त रॉयटर्सने त्यांची सल्लागार कन्सल्टन्सी कोल्मिंटच्या संदर्भाने दिले होते. एप्रिल 2020 नंतरचा हा उच्चांक आहे.

कोलमिंटमध्ये कोळसा बाजार प्रमुख अदिती तिवारी यांनी रॉयटर्सला सांगितले की,
15 फेब्रुवारीपासून रशियन बंदरांमध्ये जास्त कोळसा भरल्यास ही संख्या जास्त असेल.
कारण रशियन जहाजांना भारतात येण्यासाठी जवळपास एक महिना लागतो.

web title : Coal Import From Russia | steel minister india planning continued import of russian coking coal

हे देखील वाचा :

Congress Digital Membership | डिजिटल सभासद नोंदणीला प्रतिसाद कार्यकर्त्याचा उत्साह वाढला; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 30 तारखेला पुण्यात घेणार आढावा – माजी आ. मोहन जोशी

Pune Crime | पुण्याच्या मिल्स परिसरातील Hotel 2BHK च्या पार्किंगमध्ये तरुणीचा मध्यरात्री विनयभंग

Breasts Sagging ची समस्या दूर करण्यासाठी 5 सोप्या आणि प्रभावी पद्धती

Related Posts