IMPIMP

Condom King | ’कंडोम किंग’ नावाने ‘हा’ व्यक्ती ‘फेमस’, लोकांना मोफत वाटतो ‘निरोध’! HIV विरूद्ध सुरू केलीय मोहिम

by nagesh
Condom King | condom king africa kenya man gives free condoms to people

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Condom King | केनियामध्ये राहणारे स्टॅनली गारा (Stanley Ngara) ‘किंग’ नावाने प्रसिद्ध आहेत. एक असा किंग जो प्रजेला मोफत कंडोम (Man gives free condoms to people) वाटतो. स्टॅनली संपूर्ण अफ्रीकेत एकमेव व्यक्ती आहेत जे कंडोम किंग (Condom king) च्या नावाने प्रसिद्ध आहेत. नैरोबीच्या गल्ल्यांमध्ये फिरत ते प्रत्येक गरजू व्यक्तीला निरोध वाटतात. पण, प्रश्न हा आहे की ते सर्वांना निरोध का वाटतात?

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

अफ्रीकेत पसरवत आहेत निरोधसाठी जागरूकता

स्टॅनली यांचे म्हणणे आहे की, त्यांना आफ्रिकेतील लोकांमध्ये निरोधबाबत जागरूकता निर्माण करायची आहे. अफ्रीकेत दरवर्षी लाखो लोक एचआयव्ही आजाराचा बळी ठरतात. यामुळे अनेक लोकांचा मृत्यू सुद्धा होतो. स्टॅनली यांच्या बाबतीत अशीच एक घटना घडली, ज्यानंतर त्यांनी हे सत्कर्म सुरू करण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार, खुप वर्षांपूर्वी त्यांच्या अतिशय जवळच्या मित्राचा एचआयव्हीमुळे मृत्यू झाला होता. तेव्हापासून ते राजासारखे तयार होतात आणि रस्त्यावर मोफत निरोध वाटतात.

लैंगिक संबंधाबाबत जागरूकता

स्टॅनली केवळ कंडोम वाटण्याचेच काम करत नाही, तर लोकांना जागृत करण्याचे काम सुद्धा करतात. केनियाच्या झोपडपट्ट्यांमधील लोकांना निरोधसाठी जागरूक करतात. सोबतच एचआयव्ही आजाराबाबत सांगतात आणि अबॉर्शनच्या अडचणींबाबत सुद्धा सांगतात. त्यांचे म्हणणे आहे की, लोकांना ते त्या गोष्टींबाबत सांगतात ज्याबाबत लाज्जेस्तव शिक्षक काही सांगत नाहीत आणि कुटुंबिय सुद्धा काही सांगत नाहीत. (condom king of kenya)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Condom King | condom king africa kenya man gives free condoms to people

हे देखील वाचा :

Dr. Amol Kolhe | राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे यांनी उलगडले एकांतवासाचे गुपित, व्हिडिओ जारी करत म्हणाले… (व्हिडिओ)

Terrorists Attack | मणिपूरमध्ये आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर व त्यांच्या कुटुंबावर अतिरेक्यांकडून हल्ला; अधिकाऱ्याच्या पत्नी आणि मुलासह 7 जवान शहीद

Tulsi Vivah 2021 | तुळशी विवाहात करा ‘या’ मंत्राचे आणि मंगलाष्टकांचे पठन, मिळेल ‘सुख-सौभाग्य’

Related Posts