IMPIMP

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

by pranjalishirish
congress balasaheb thorat ncp sharad pawar bjp amit shah meet

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar  आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अहमदाबाद येथे भेट झाल्याचे समजत आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे वृत्त फेटाळण्यात आले. मात्र भाजपच्या काही नेत्यांकडून सूचक वक्तव्ये करण्यात आली. तसेच राज्यात कोणतीही नवी समीकरणे अस्तित्वात येणार नाहीत असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या सर्व घडामोडींवर काँग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
“अशा बातम्यांना आम्ही फार महत्व देत नाही. राष्ट्रवादीने देखील यासंबंधी स्पष्ट खुलासा केला आहे. रात्रीच मी पवारांच्या Sharad Pawar तब्येतीची विचारणा करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बोललो. त्यांनीदेखील मुद्दामून हा विषय काढला आणि कसे लोक भेद, गैरसमज निर्माण करत असल्याचे सांगितले. त्यांना भेटायचे असते तर दिल्लीत सर्वांची घरं आहेत तिथेही भेटू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचं वेगळं काही असेल असं मला वाटत नाही”. असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. तसेच “विरोधी पक्ष काही खडे टाकण्यात यशस्वी होतो आणि मीडियाकडून तो विषय उचलला जातो. वस्तुस्थिती वेगळी असते आणि मीडियामध्ये वेगळं सुरु असतं,” असेदेखील बाळासाहेब थोरात म्हणाले.

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

काय म्हणाले होते संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवारांनी युपीएचं नेतृत्व करण्यासंबंधीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना “युपीएचं नेतृत्व सोनिया गांधीच करणार आहेत. शेवटी काँग्रेस हा एक देशव्यापी पक्ष आहे. कदाचित काँग्रेस पक्ष अडचणीच्या काळातून जात असेल, मात्र देशाचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे आणि त्यांच्याकडेच राहणार आहे. अवघड दिवस निघून जातील आणि पुन्हा काँग्रेसेच दिवस येतील. त्यामुळे अशी कल्पना मांडणं मला योग्य वाटत नाही”. असे ते म्हणाले होते.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

“संजय राऊत हे एका बाजूला राजकारणी आहेत. आघाडी सरकार होण्यात त्यांचा खूप मोठा सहभाग असल्याचं आम्ही जाहीरपणे सांगत असतो. पण ते एका वृत्तपत्राचे संपादकसुद्धा आहेत. कदाचित राजकारणी आणि संपादक यामध्ये त्यांची गल्लत होते का काय असे वाटते. तीन पक्ष एकत्र असताना आणि चांगलं काम करत असताना त्यांना बळ देणं त्यांचे काम आहे. असे वक्तव्य करुन मनात दोष निर्माण होतो हे त्यांनी करु नये,” असे मत बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

तसेच “अशा वक्तव्यामुळे नाराजी निर्माण होत असते. जेव्हा आघाडीचे प्रमुख एकत्र येतो तेव्हा यावर साहजिकच चर्चा होते. आघाडीचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे, आम्ही घटकपक्ष आहोत. सर्वांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. सोनिया गांधी आणि शरद पवारांमध्ये Sharad Pawar  चांगले संबंध आहेत तेव्हा असे वक्तव्य करुन भेद निर्माण करण्याची काही गरज नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

Also Read:

भाजप नगरसेविकेच्या मुलाची आत्महत्या, तपास सुरु

लस घेऊनही शेकापचे आमदार जयंत पाटील ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

राष्ट्रवादीसोबत जाणार का ?, त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात…

भाजपकडून ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘शिवसेनेनं आपलं पाप उघड होईल, म्हणून मिठी नदी साफ केली नाही’ (व्हिडीओ)

CM ठाकरेंचे मुख्य सचिवांना आदेश, म्हणाले – ‘Lockdown ची तयारी करा’

आनंद महिंद्रांचा Lockdown बाबत ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले – ‘त्या’वर पुन्हा लक्ष केंद्रीत करूयात’

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण

Related Posts