IMPIMP

Congress Leader On Maharashtra Vidhan Sabha | लोकसभेतील यशानंतर काँग्रेस घेणार धाडसी निर्णय? काँग्रेसकडून स्वबळाची तयारी?

by sachinsitapure

नागपूर: Congress Leader On Maharashtra Vidhan Sabha | लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) विश्वास सध्या उंचावला आहे. सर्वांना आता विधानसभेचे वेध लागले असून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. या निकालानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून स्वबळाची भाषा येताना दिसत आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील २८८ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले. त्यानंतर काँग्रेसमधूनही मोठी प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेसने स्वबळाची तयारी करावी, अशी भूमिका माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी (MLA Abhijeet Vanjari) यांनी मांडली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ -छोटा भाऊवरून वाद झाला.

त्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सारवासारवही करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाने महाविकास आघाडीत खळबळ उडालेली असतानाच आता काँग्रेसमध्येही स्वबळाचा नारा घुमू लागला आहे.

आमदार अभिजित वंजारी म्हणाले, “तीन पक्षांत लढताना २८८ जागांचे विभाजन, जागावाटपात समन्वय साधताना चांगल्या कार्यकर्त्यांचे नुकसान होते. मित्रपक्ष म्हणून मैत्रीपूर्ण लढत करून, निवडणुकीनंतर आघाडी करता येईल. विधानसभेत वेगळे लढलो तरी, आघाडी करून सरकार स्थापन करता येऊ शकते. तिन्ही नेत्यांनी बसून हा विचार करायला पाहिजे. नंतर दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून लवकर तयारी सुरू करण्याची गरज आहे”, असेही वंजारी यांनी स्पष्ट केले.

Related Posts