IMPIMP

Coronavirus in Pune | पुणेकरांनो मुलांची विशेष काळजी घ्या ! आठवडयाभरातील धक्कादायक आकडेवारी आली समोर

by nagesh
Coroanvirus in Pune | parents take care of children as last 6 days four times child were tests positive for covid19 in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Coronavirus in Pune | राज्यात कोरोना रूग्णांचा (Coronavirus) आकडा झपाट्याने वाढतो आहे. त्याचबरोबर पुण्यात देखील देनंदिन बाधितांचा (Coronavirus in Pune) आकडा वाढत आहे. त्यामुळेे सर्वत्र चिंता वाढली आहे. अशातच आता पुण्यात लहान मुलांनाही (Kids) कोरोनाची बाधा होत असल्याचं समोर आलं आहे. मागील 6 दिवसांमध्ये तब्बल चौपट मुलांना कोरोनाचा संसर्ग (Covid Positive) झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणेकरांनो लहान मुलांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मागील काही दिवसांपासून पुण्यात (Pune News) कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. यातच आता कोरोनाचा शिरकाव लहान मुलांमध्ये होताना दिसत आहे. त्यामुळे पुणेकरांची अधिकच चिंता वाढली असली तरी योग्य काळजी घेणे महत्वाचे असणार आहे. दरम्यान, बालकांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. 1 डिसेंबर ते 11 जानेवारी या कालावधीत 0 ते 11 वयोगटातील 2488 मुलांना कोरोनाची लागण झाली. पुणे शहरात 0 ते 10 आणि 11 ते 20 वयोगटातील कोरोना बधितांची संख्या 6 दिवसात चारपटीने वाढली आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मुलांना सर्दी, ताप, खोकला असेल तर चाचणी करुन घेण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे. (Coronavirus in Pune)

पुण्यात रुग्णांची आकडेवारी – (पुणे शहर -13 जानेवारी)

नवे कोरोना बाधित -5 हजार 571, तीन रुग्णांच्या मृत्यू

ऑक्सिजनवरील रूग्ण – 182

इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरील रूग्ण – 19

नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर रुग्ण – 26

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोरोनावरील मात केलेल्यांची संख्या – 2 हजार 335 रुग्ण

एकूण कोरोना बाधित – 5 लाख 42 हजार 989

सक्रिय रुग्ण – 25 हजार 737

Web Title : Coroanvirus in Pune | parents take care of children as last 6 days four times child were tests positive for covid19 in pune

हे देखील वाचा :

Skin Care Tips | दह्यासोबत हळदीचा ‘या’ प्रकारे करा वापर, मिळतील ‘हे’ 5 आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या

Chandrakant Patil | मुंबै बँक निवडणूकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटलांचं शिवसेनेसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘त्यांना पुर्णपणे संपवण्याचा…’

Calcium Deficiency | शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेची इशारा देतात ‘ही’ 7 लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

Related Posts