IMPIMP

Corona in Maharashtra | मंत्री विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान; म्हणाले – ‘सध्याची कोरोना रूग्णसंख्या वाढ हे चौथ्या लाटेचेच संकेत’

by nagesh
Corona in Maharashtra | Minister Vijay Vadettivar's big statement; "The current corona outbreak is a sign of a fourth wave," he said.

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Corona in Maharashtra | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांचा (Corona in Maharashtra) आकडा वाढताना दिसत आहे. यामुळे राज्याला चिंता लागून आहे. यंदा चौथ्या लाटेची शक्यता असल्याचं दिसत आहे. रविवारी राज्यात 1 हजार 494 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी राज्यात 1357 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra State Government) राज्यातील नागरीकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. यानंतर आता राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठं विधान केलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

विजय वडेट्टीवार म्हणाले, “सध्याची कोरोना रुग्णसंख्या वाढ हे चौथ्या लाटेचेच संकेत आहेत. तूर्तास तरी मास्क सक्ती नाही, मात्र कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर मास्क सक्तीचा आणि निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागेल,” असं विधान त्यांनी केलं आहे. तसेच, ‘शाळा सुरु करण्याबाबत मात्र आता तरी थांबता येणार नाही. गेली दोन वर्षे शैक्षणिक नुकसानाने एक पिढी बरबाद झाली आहे. पुढील 8 ते 10 दिवसांत जी परिस्थिती असेल ती बघून निर्णय घेता येईल,’ असं ते म्हणाले. (Corona in Maharashtra)

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीवर चर्चा जरुर होईल, मात्र निर्बंधांबाबतचा विषय सध्या तरी अजेंडावर नाही. परंतु नागरिकांनी मास्क घालावेत. ही स्वयंशिस्त लोकांनीच पाळावी,” असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

Web Title :- Corona in Maharashtra | Minister Vijay Vadettivar’s big statement; “The current corona outbreak is a sign of a fourth wave,” he said.

हे देखील वाचा :

Maharashtra Crime News | धक्कादायक ! महिला तहसिलदारावर तहसील कार्यालयात कोयत्याने हल्ला

Gopichand Padalkar On Sharad Pawar | आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली; शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका

NPS Or EPF Which Is Better | NPS आणि EPF या दोन्ही पैकी रिटायर्मेंट प्लानिंगसाठी काय आहे चांगले

Related Posts