IMPIMP

Corona-Omicron Variant | घातक व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत ‘सील’ होणार

by bali123
Corona-omicron Variant | entire building will be sealed if any patient found have omicron variant mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Corona-Omicron Variant | गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे (Corona virus) राज्यात नाही तर संपुर्ण देशात लाॅकडाउन होतं. सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने अनलॉक झालं अन् जवळपास सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहे. मात्र, नुकतंच दक्षिण आफ्रिकेसह काही देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (Corona-Omicron Variant) शिरकाव केला. या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने (Central Government) सर्व राज्यांना अलर्टच्या सुचना दिल्या. यानंतर नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील (Maharashtra Government) मुंबई महानगर प्रदेश विभागातील (MMRDA) सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन घेण्याच्या सूचना राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

ओमीक्रॉन व्हेरिएंट (Corona-Omicron Variant) धोक्यामुळे राज्याचे मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सूचनेनुसार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील (Mumbai metropolitan area) सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे (VC) तातडीची बैठक आज घेतली. या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी (Bhushan Gagrani), मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांचेसह ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

‘गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या राज्यात घटते आहे, ही समाधानाची बाब असली तरी यामुळे यंत्रणा जरा निर्धास्त झालेल्या दिसतात, सामान्य नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले असून आता आपल्याला गाफिल राहून चालणार नाही, कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांची रुग्णालये सज्ज ठेवा. सुदैवाने सध्या रुग्ण नसल्याने बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यंत्रणा बंद आहेत. रुग्णालयांमधील आयसीयू कक्ष, ऑक्सिजन प्लान्ट, व्हेंटिलेटर यंत्रे यांची तपासणी करुन ते सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेण्याचे निर्देश’ एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मुंबई महानगरपालिकेने विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करुन मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये जे प्रवासी विदेशातून आले आहेत, त्यांची यादी सर्व महानगरपालिकांना उपलब्ध करुन द्याव्या. कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट सापडलेल्या 10 देशांमधून आलेल्या प्रवाशांची माहिती सर्व पालिकांनी सहायक आयुक्तांच्या माध्यमातून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. अति जोखमीच्या देशातून गेल्या 14 दिवसांतून आलेल्या प्रवाशांची देखील यादी विमानतळाकडून घेण्याच्या सूचना देखील शिंदे यांनी यावेळी दिल्या आहेत.

दरम्यान, ‘विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे करण्यात येणार असून त्यांचे कोणत्याही परिस्थितीत गृह अलगीकरण (Home Separation) करण्यात येणार नाही,
असे सांगून दुर्दैवाने असा रुग्ण आढळून आल्यास त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रांमध्ये स्वतंत्रपणे उपचार करण्यात येणार आहे.
तसेच, बृहन्मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रातील सर्व रुग्णालयांचे तसेच कोरोना उपचार केंद्रांचे संरचनात्मक,
अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन त्याची चाचणी घेण्यात येणार आहे.
व्हेन्टिलेटरची तपासणी करुन ते गरजेनुसार वापरता येईल यादृष्टीने ते सज्ज करुन ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, घातक व्हेरियंटचा एकही रुग्ण जर एखाद्या इमारतीत आढळला तर संपूर्ण इमारत सील करण्यात येणार आहे.’
अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली आहे.

Web Title :- Corona-omicron Variant | entire building will be sealed if any patient found have omicron variant mumbai

Related Posts