IMPIMP

Corona Vaccination in India | भारताची लसीकरण मोहिमेत चमकदार कामगिरी; अमेरिका, इंग्लंड सारख्या बलाढ्य देशांनाही टाकलं मागे

by nagesh
Corona Vaccination in India | india pm modi leadership running most successful and largest vaccination programme world

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Corona Vaccination in India | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona Virus) हाहाकार माजवल्यानंतर डेल्टाने (Delta) जगभराचे संकट वाढवले. त्याचे प्रमाण कमी होते ना होते तोपर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंट चा (Omicron Variant) संसर्ग वाढला. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. कोरोना नियंत्रणासाठी कोरोना प्रतिबंधक लस (Corona Preventive Vaccine) हाच एकमेव पर्याय असून संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. दोन डोस घेतल्यानंतर बुस्टर डोसही (Booster Dose) देण्याचे नियोजन सुरु असून इस्त्रायलमध्ये तर त्याला सुरुवात झाली आहे. मात्र, आता लसीकरणाबाबत एक नवी माहिती समोर आली असून अमेरिका, इंग्लंडसारख्या बलाढ्य देशांना मागे टाकत भारताने लसीकरण (Corona Vaccination in India) मोहिमेत आघाडी घेतल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मनसुख मांडवीय म्हणाले, ‘भारतात आजपासून 15 ते 18 वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण (Vaccination) सुरू करण्यात आले आहे. जगातील
सर्वात यशस्वी आणि सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्चाखाली सुरु आहे. कमी
लोकसंख्या असलेल्या अनेक विकसित पाश्चात्य राष्ट्रांपेक्षा भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेची कामगिरी चांगली आहे. (Corona Vaccination in India)

काही दिवसांपूर्वीच एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने भारताने लसीकरणाचे लक्ष्य चुकवल्याचा दावा केला होता. तो दावाही मांडवीय यांनी फेटाळून लावत हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे म्हंटले आहे. या दाव्यातून संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही, असे केंद्र सरकारने (Central Government) यापूर्वीच स्पष्ट केले आहे. कमी लोकसंख्या असलेल्या अनेक विकसित पाश्चात्य राष्ट्रांतील लसीकरणाची तुलना केली तर भारतातील लसीकरण मोहिम सर्वात यशस्वी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भारतात 16 जानेवारी 2021 रोजी लसीकरणाला सुरुवात झाली. त्या दिवसापासून 90 टक्के पात्र नागरिकांना पहिला डोस तर दुसरा डोसच्या 65 टक्क्यांपेक्षा जास्त डोस दिले आहेत. इतर देशांची तुलना केली तर भारताची कामगिरी चांगली आहे. 9 महिन्यांच्या कमी कालावधीत 100 कोटी डोस देणे,एकाच दिवसात 2.51 कोटी डोस देणे आणि अनेकदा दररोज 1 कोटी डोस देणे ही कामगिरीदेखील उल्लेखनीय आहे.

Web Title : Corona Vaccination in India | india pm modi leadership running most successful and largest vaccination programme world

हे देखील वाचा :

Restrictions in Pune | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नवे निर्बंध लागणार? महापौर मोहोळ यांची उद्या अजित पवारांसोबत बैठक

Sameer Wankhede | अखेर समीर वानखेडेंची बदली, ‘या’ विभागात केली नियुक्ती

Shivajirao Adhalarao Patil | आढळरावांचा खळबळजनक आरोप; म्हणाले – ‘गृहमंत्र्यांचा उजवा हात असलेला कार्यकर्ता संपवून टाकण्याची धमकी देतो’

Related Posts