IMPIMP

Corona Vaccine | खुशखबर ! दिर्घ प्रतीक्षेनंतर अखेर स्वदेशी व्हॅक्सीन Covaxin ला जागतिक पातळीवर मान्यता, मेडिकल जर्नल लान्सेंटकडून शिक्कामोर्तब

by nagesh
Corona Vaccine | bharat biotech covaxin phase 3 data published in lancet 77 percent effective against symptomatic covid

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– कोरोना व्हायरस (Corona Vaccine) विरूद्ध व्हॅक्सीन एक मोठे शस्त्र मानले जात आहे. भारतात सध्या 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस (Corona Vaccine) दिली जात आहे. भारतात तयार झालेली स्वदेशी व्हॅक्सीन कोव्हॅक्सीन (Covaxin) प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे अखेर जागतिक पातळीवरील प्रसिद्ध मेडिकल जर्नल ’लान्सेंट (Lancet)’ ने मान्य करत शिक्कमोर्तब केले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

जर्नलमध्ये कोव्हॅक्सीनच्या तिसर्‍या टप्प्यातील ट्रायलचा पीयर रिव्ह्यू डेटा छापला आहे. डब्ल्यूएचओने सुद्धा कोव्हॅक्सीनला मंजूरी देण्यास खुप उशीर केला.
मागील आठवड्यातच WHO ने कोव्हक्सीनला मंजूरी दिली आहे.

कोरोनाविरूद्ध किती प्रभावी आहे कोव्हॅक्सीन?

कोव्हॅक्सीन (Covaxin) च्या तिसर्‍या टप्प्याच्या ट्रायलची लान्सेंटमध्ये प्रसिद्ध पीयर रिव्ह्यू डेटानुसार, ही स्वदेशी व्हॅक्सीन कोरोनाच्या विरूद्ध 77.8 टक्के प्रभावी आहे.
तर ही व्हॅक्सीन कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंट (Coronavirus Delta Variant) विरूद्ध 65.2 टक्के प्रभावी आहे.

याशिवाय कोरोनाच्या गंभीर संसर्गावर कोव्हॅक्सीन 93.4 टक्के प्रभावी आढळली आहे.
लान्सेंटमध्ये प्रसिद्ध कोव्हॅक्सीनच्या पियर रिव्ह्यू डेटानुसार, 18 ते 59 वर्षाच्या लोकांवर व्हॅक्सीन 79.4 टक्के प्रभावी आहे.
तर 60 वर्षावरील लोकांवर कोव्हॅक्सीन 67.8 टक्के प्रभावी (Corona Vaccine) आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पूर्णपणे सुरक्षित आहे कोव्हॅक्सीन

लान्सेंटने एका वक्तव्यात म्हटले की, कोव्हॅक्सीनचे दोन्ही डोस दिल्यानंतर दोन आठवड्यानंतर ही लस एक मजबूत अँटीबॉडी रिस्पॉन्स उत्पन्न करते.
मेडिकल जर्नलने म्हटले की, भारतात नोव्हेंबर 2020 आणि मे 2021 च्या दरम्यान 18-97 वर्ष वयाच्या 24419 स्वयंसेवकांना सहभागी करणार्‍या
कोव्हॅक्सीनच्या ट्रायल दरम्यान व्हॅक्सीनसंबंधीत मृत्यू किंवा इतर कोणतीही गंभीर प्रतिकूल घटना नोंदली गेली नाही.

भारत बायोटेकने केली निर्मिती

कोरोना व्हॅक्सीन कोव्हॅक्सीन (Covaxin) इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या सहयोगाने विकसित करण्यात आली आहे.
जी हैद्राबाद येथील फार्मास्युटिकल फर्म भारत बायोटेक (Bharat Biotech) ने बनवली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

खुप उशीराने दिली डब्ल्यूएचओने कोव्हॅक्सीनला मंजूरी

या महिन्याच्या सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने भारतीय व्हॅक्सीन कोव्हॅक्सीन (Covaxin) ला इमर्जन्सी वापरासाठी मंजूरी दिली होती.
डब्ल्यूएचओकडून मान्यता मिळाल्यानंतर कोव्हॅक्सीनचा डोस घेतलेल्या भारतीयांसाठी आंतरराष्टीय प्रवास सोपा झाला आहे.

दोन्ही लशींना मान्यता

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटले की, 96 देशांनी डब्ल्यूएचओ द्वारे स्वीकृत व्हॅक्सीनला एक तर मंजूरी दिली आहे किंवा काही देशांनी केवळ कोविशील्ड किंवा कोव्हॅक्सीनलाच मंजूरी दिली आहे. डब्ल्यूएचओने कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन दोन्ही लशींना (Corona Vaccine) मान्यता दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :  Corona Vaccine | bharat biotech covaxin phase 3 data published in lancet 77 percent effective against symptomatic covid

हे देखील वाचा :

Govinda Naam Mera | भेटा विकी कौशलच्या ‘नॉटी गर्लफ्रेंड’ला ! कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर आणि विकी कौशलच्या ‘गोविंदा नाम मेरा’चं पहिलं पोस्टर रिलीज

RRC Railway Recruitment 2021 | 12 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रेल्वेत विना परीक्षा 1664 पदांसाठी भरती, जाणून घ्या

Pune Crime | पुण्यातील न्यायालयात बनावट कागदपत्राद्वारे जामीन मिळवून देणार्‍या रॅकेटवर गुन्हे शाखेची ‘धाड’; सात जणांना अटक

Related Posts