IMPIMP

Corona Vaccine Booster Dose | आजपासून ‘या’ लोकांना मिळणार कोरोनाचा बूस्टर डोस; जाणून घ्या प्रक्रिया

by nagesh
Corona Vaccine Booster Dose | corona vaccine booster dose today seniors frontline workers will get booster dose india Omicron Covid Variant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Corona Vaccine Booster Dose | कोरोना संसर्गाचे (Coronavirus) प्रमाण वाढू लागले आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron Covid Variant) बाधित रुग्ण संख्याही वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. तर 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण (Vaccination) करण्यास सुरुवात केली काही. दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या डोसची म्हणजे बूस्टर डोसची (Corona Vaccine Booster Dose) आवश्यकता असल्याने तो डोसही आजपासून देण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्य कर्मचारी आणि 60 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. परंतु तिसरा डोस कोणी घ्यायचा? रजिस्ट्रेशन (Registration) पुन्हा करावं लागेल का? किती वेळानंतर बूस्टर डोस घ्यायचा? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोणती लस घ्यावी लागेल?
कोरोना लसीचा ज्यांनी पहिला आणि दुसरा डोस ज्या लसीचा घेतला आहे तीच लस तिसरा डोस म्हणजे बूस्टर डोस त्याच लसीचा घ्यावा लागणार आहे. म्हणजे जर तुम्ही कोविशील्डचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर तुम्हाला बूस्टर डोसही कोविशील्ड लसीचा घ्यावा लागेल. (Corona Vaccine Booster Dose)

रजिस्ट्रेशन करावं लागेल का?
बूस्टर डोस (Booster Dose) साठी पुन्हा नोंदणी करावी लागेल का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण यापूर्वीचे दोन्ही डोस घेताना नोंदणी करावी लागली होती. मात्र आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार बूस्टर डोस घेण्यासाठी पुन्हा रजिस्ट्रेशन करणं गरजेचे नाही. त्यांच्याकडे दोन पर्याय आहेत. सुरुवातीला ते Cowin APP वर जाऊन वेळ घेऊ शकतात. या App वर बूस्टर डोसची वेगळा पर्याय दिला आहे. त्याठिकाणी सुलभपणे तुम्ही वेळ घेऊ शकता. दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही थेट लसीकरण केंद्रावर जात लसीकरण करुन घेऊ शकता. त्याठिकाणीही नोंदणी करण्याची गरज नाही.

किती कालावधीनंतर बूस्टर डोस घेऊ शकता?
ज्या व्यक्तीचे कोरोनाचा दुसरा डोस होऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत. त्या व्यक्ती तिसऱ्या डोससाठी पात्र आहेत. मात्र हा कालावधी कमी असेल तर बूस्टर डोससाठी वाट पाहावी लागणार आहे.

लसीकरण केंद्रावर प्रमाणपत्र दाखवावे लागेल?
जर तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे आणि तुम्ही इतर आजाराने त्रस्त आहात तर विना रजिस्ट्रेशन अथवा प्रमाणपत्र लसीचा डोस घेऊ शकतो. परंतु तिसरा डोस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या असं आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

बूस्टर डोस नंतर लसीकरण प्रमाणपत्र मिळेल?
ज्या पद्धतीने पहिला आणि दुसऱ्या डोसनंतर प्रमाणपत्र मिळाले होते. त्याचप्रमाणे बूस्टर डोस घेतल्यानंतरही प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र रजिस्टर्ड मोबाईलवर पाठवलं जाईल. त्यात जन्मतारीख आणि अन्य महत्त्वाची माहिती असेल.

कोणाला लस मिळणार?
आरोग्य कर्मचारी आणि फ्रंन्टलाईन वर्कर्समध्ये असणारे पोलीस आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांना हा बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

लसीकरण केंद्रावर कोणती कागदपत्रे घेऊन जावीत?
मतदार ओळखपत्र (Voter ID), आधार कार्ड (Aadhaar Card), पॅन कार्ड (PAN Card),
वाहन परवाना (Driving Licence) यापैकी कुठलेही एक ओळखपत्र घेऊन लसीकरण केंद्रावर जावं लागेल.
त्याचआधारे बूस्टर डोस दिला जाईल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Corona Vaccine Booster Dose | corona vaccine booster dose today seniors frontline workers will get booster dose india Omicron Covid Variant

हे देखील वाचा :

Coronavirus Cases Today In India | भारतात कोरोनाचा कहर ! गेल्या 24 तासात समोर आली 1.79 लाख नवीन प्रकरणे; परंतु ‘या’ गोष्टीमुळं मिळाला दिलासा

Coronavirus Maharashtra Police | राज्यातील 1 हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण; काही IPS सह 316 अधिकार्‍यांना संसर्ग, 24 तासात 276 पोलिसांना लागण

Coronavirus in India | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची मध्यावस्था; फेब्रुवारीत कळस गाठण्याची शक्यता

Related Posts