IMPIMP

Coronavirus | कोरोना झाल्याने प्रायव्हेट पार्ट झाला 1.5 इंच छोटा, दावा ऐकून डॉक्टर्स सुद्धा झाले हैराण

by nagesh
Coronavirus | a man claims he has lost more than 1 inches from length of his penis after covid 19

नवी दिल्ली – वृत्त संस्था  – Coronavirus | अमेरिकेतील एका व्यक्तीने कोरोना (Coronavirus) ची लागण झाल्यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट (private
part – penis) 1.5 इंच आकुंचित झाल्याचा दावा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याने असेही म्हटले आहे की कोरोनामुळे त्याच्या
रक्तवहिन्यासंबंधी प्रणाली (vascular system) चे नुकसान झाले आहे (penis has shrunk by 1.5 inches after corona).

त्या व्यक्तीचा दावा आहे की, कोरोना संसर्गापूर्वी त्याच्या लिंगाचा आकार (penis size) सरासरीपेक्षा जास्त होता. या दुर्मिळ लक्षणाबाबत एका अभ्यासात खळबळजनक निष्कर्ष समोर आले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हॉस्पिटलमधून परतल्यानंतर आढळला फरक

’हाऊ टू डू इट’ या सेक्स अ‍ॅडव्हाईस पॉडकास्ट (sex advice podcast) मध्ये या माणसाने त्याच्या समस्या कथन केल्या. पीडितच्या म्हणण्यानुसार, जुलै 2021 मध्ये त्याला कोरोनाची लागण झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.

या व्यक्तीने दावा केला आहे की, काही दिवसांनी जेव्हा तो हॉस्पिटलमधून घरी परतला तेव्हा त्याला वाटले की त्याचे लिंग पूर्वीपेक्षा लहान झाले आहे.

कोरोनामुळे लैंगिक क्षमतेवर परिणाम

या पुरुषाचे असेही म्हणणे आहे की लहान लिंगाचा त्याच्या आत्मविश्वासावर आणि लैंगिक क्षमतेवर खोलवर परिणाम झाला आहे. ’हाऊ टू डू इट’ने या माणसाची ओळख गुप्त ठेवली आहे. मात्र, या व्यक्तीचे वय सुमारे 30 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनानंतर इरेक्टाईल डिसफंक्शन समस्या

मिरर ऑनलाइनमध्ये प्रसिद्ध बातमीनुसार, त्या व्यक्तीने सांगितले की, तो कोरोना आजारातून बरा झाल्यानंतर इरेक्टाईल डिसफंक्शनला (नपुंसकत्व) बळी पडला. अनेक महिने या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपचारही केले, मात्र यश मिळू शकले नाही. (Coronavirus)

त्याने दावा केला की डॉक्टरांनी त्याला सांगितले की, जननेंद्रियाचा आकार कायमस्वरूपी कमी राहू शकतो. याचे कारण लिंगाच्या नसापर्यंत कमी रक्त पोहोचणे आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

संशोधनात दुर्मिळ निघाले लक्षण

लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजने केलेल्या अभ्यासात कोरोना आणि लिंगाची लांबी कमी होण्याचा संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या संशोधनात 3400 लोकांचा समावेश करण्यात आला होता.
ज्यांना दीर्घकाळ कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 200 लोकांमध्ये पूर्वीपेक्षा लहान लिंगाचे दुर्मिळ प्रकरण आढळून आले.

आणखी एका स्टडीमध्ये झाले सिद्ध

यूएस मधील मियामी मिलर स्कूल ऑफ मेडिसिन युनिव्हर्सिटीनेही वर्ल्ड जर्नल ऑफ मेन्स हेल्थमध्ये संबंधित अभ्यास प्रकाशित केला आहे.
यात असा दावा करण्यात आला आहे की काही लोकांमध्ये दीर्घकाळापासून कोरोनामुळे नपुंसकत्वाची लक्षणे दिसली आहेत.

Web Title : Coronavirus | a man claims he has lost more than 1 inches from length of his penis after covid 19

हे देखील वाचा :

Indian Railways | ट्रेनमध्ये आता असणार नाही ‘गार्ड’, भारतीय रेल्वेने नाव बदलून केले ‘ट्रेन मॅनेजर’; जाणून घ्या नेमकं काय झालं

Restrictions in Pune | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नवे निर्बंध? अजित पवारांची तातडीची बैठक

7th Pay Commission | पेन्शनर्सच्या खात्यात लवकरच जमा होतील ‘या’ भत्त्याचे हजारो रुपये, सरकारने केली घोषणा

Related Posts