IMPIMP

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 1,898 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Coronavirus in Maharashtra | Doctor in Corona's lap too! Possibility of impact on healthcare in Mumbai, 305 doctors in the state infected with corona

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  राज्यातील कोरोना संसर्गाची (Coronavirus in Maharashtra) दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. राज्यात अजुनही दररोज दोन हजारांच्या आसपास नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) आढळून येत असून, कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे (Recover Patient) होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 898 रुग्ण बरे झाले आहेत. तर 2 हजार 149 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राज्यात गेल्या 24 तासात 29 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 734 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के एवढा आहे.
राज्यात आजपर्यंत 64 लाख 15 हजार 316 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.37 टक्के एवढे झाले आहे. (Coronavirus in Maharashtra)

सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 65 लाख 88 हजार 429 इतकी आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 08 लाख 09 हजार 054 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 88 हजार 429 (10.88 टक्के) नमुने पॉझिटिव्ह (positive patients) आले आहेत.
सध्या राज्यात 2 लाख 27 हजार 467 व्यक्ती गृह विलगिकरणात (home quarantine) आहेत.
तर, 1 हजार 002 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात (institutional quarantine) आहेत.
राज्यात आज रोजी एकूण 29 हजार 782 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण (Active Cases) आहेत.

Web Title : Coronavirus in Maharashtra | 1,898 ‘corona’ free in the last 24 hours in the state, find out other statistics

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | शरद पवारांवर टीका करताना चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली; एकेरी भाषेत टीका करत म्हणाले… (व्हिडीओ)

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 63 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Kisan Credit Card | SBI कडून बनवा किसान क्रेडिट कार्ड, घेऊ शकता 3 लाखापर्यंत कर्ज; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Related Posts