IMPIMP

Coronavirus in Pune | पुणे शहरात कोरोना बाधितांपैकी फक्त 4 टक्के रुग्ण रुग्णालयात

by nagesh
Coronavirus in Pune | only 4 corona patients are hospitalized pune city coronavirus news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Coronavirus in Pune | राज्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत (Coronavirus) प्रचंड वाढ होताना दिसत आहे.
राज्यातील मुंबईनंतर पुण्यात देखील कोरोना बाधितांचा (Coronavirus in Pune) आकडा वाढतो आहे. मात्र कोरोना बाधित सापडणा-या रुग्णांमध्ये
सौम्य लक्षणे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा रूग्णांना गृहविलगीकरणात (Home Separation) ठेवण्याचा पर्याय सुचवण्यात आला असल्याचे म्हटले आहे. पुणे शहरात (Pune News) फक्त 4.34 टक्के रुग्ण रुग्णालयात (Hospital) दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) माहितीनूसार, शहरातील बऱ्याच नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याने कोरोनासोबत लढण्याची ताकद शरीरात दिसून येत आहे. म्हणून सक्रिय रुग्ण वाढत असले तरी केवळ 4.34 टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल असल्याचे दिलासादायक चित्र आहे. तरीसुद्धा नागरिकांनी नियमांचे पालन करावे. असं देखील आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे. (Coronavirus in Pune)

दरम्यान, पुणे शहरातील कोरोना बाधितांची एँक्टीव्ह रूग्णसंख्या 25 हजार 737 एवढी झाली आहे. तर, एकूण कोरोना बाधितांपैकी 900 ते 1000 च्या जवळपास रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. गुरूवारी (13 जानेवारी) रोजी शहरात पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. तेव्हा दिवसभरात पाच हजार 571 जण कोरोना बाधित असल्याचे आढळले होते. त्याचबरोबर दिवसभरात 19 हजार 868 जणांची तपासणी केली होती तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी 27.04 टक्के होती.

Web Title : Coronavirus in Pune | only 4 corona patients are hospitalized pune city coronavirus news

हे देखील वाचा :

Multibagger Stock | एक लाख गुंतवून कमावले 64 लाख, तुम्ही सुद्धा घरबसल्या करू शकता असे

TCS Share Price | टीसीएसच्या शेयरमधून तुम्ही करू शकता 30% कमाई, निकालानंतर काय म्हणत आहेत एक्सपर्ट

Mahabaleshwar Temperature | पहिल्यांदाच महाबळेश्वरमध्ये पारा ‘शून्य’ अंशावर, जाणून घ्या राज्यातील परिस्थिती

Related Posts