IMPIMP

Coronavirus | जगात कोरोनाचा वाढता कहर, भारतात पुन्हा मास्क सक्ती? केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या…

by nagesh
Coronavirus | minister bharati pawar on corona outbreak in china and mask compulsion again in india

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. चीनसह (China), अमेरिका (USA), ब्राझील (Brazil) आणि जपानमध्ये (Japan) कोरोना विषाणूचा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भारतात कोरोनाचा (Coronavirus) पुन्हा उद्रेक होऊ नये यासाठी आज केंद्रीय स्तरावर महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. तसेच भारतात पुन्हा मास्क बंधनकारक (Mask) करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State Dr. Bharti Pawar) यांनी दिली. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आज होणाऱ्या बैठकीमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार असून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचे डॉ. भारती पवार यांनी सांगितले. चीनमध्ये कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक, भारत अलर्ट मोडवर असून पवार यांनी नागरिकांसाठी काही खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत.

भारती पवार म्हणाल्या, चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवेसेंदिवस वाढत आहे. यामुळे चीनमधून येणारे पर्यटक, प्रवासी यांच्याबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच भारतात मास्क देखील बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारतामध्ये दोन वर्षापूर्वी कोरोनाने धुमाकूळ घातला होता. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. जीवघेण्या महामारीमुळे संपूर्ण देश ठप्प झाला होता. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. तसेच त्याठीकाणी कोरोनाचे रुग्ण (Patient) वाढत असल्याने इतर देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. भारतात आज त्याच पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक होणार आहे.

दरम्यान, भारतातील कोरोनाबाधितांचा आलेख दिवेसेंदिवस कमी होताना दिसत आहे.
काही महिन्यांपूर्वी एका दिवसाला लाखोंच्या संख्येत आढळणारे नवीन कोरोना रुग्णांचे प्रमाण आता 131 वर
पोहचले आहे. परंतु, आशावेळी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचं आहे.
गाफील राहण्याची चूक करु नका, असं मत आरोग्य तज्ज्ञांनी (Health Experts) व्यक्त केलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Coronavirus | minister bharati pawar on corona outbreak in china and mask compulsion again in india

हे देखील वाचा :

Health Care | वारंवार जांभई येणे असू शकतो या ५ आजारांचा संकेत, करू नका दुर्लक्ष
Devendra Fadnavis | पोर्नोग्राफिक विकृतीला ठेचण्यासाठी राज्यात सायबर प्रकल्प उभारणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Avatar Movie | अवतार सिनेमावरील ‘त्या’ वक्तव्याने गोविंदा झाला चांगलाच ट्रोल; म्हणाला…

Health Alert | रात्री होत असेल झोपमोड तर व्हा सतर्क! धोक्यात आहे तुमच्या शरीराचा ‘हा’ अवयव

Related Posts