IMPIMP

Coronavirus | बेजबाबदारपणे वागाल तर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन अटळ – ICMR

by nagesh
Coronavirus | Strict lockdown is inevitable once again if you act irresponsibly - ICMR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Coronavirus | सध्या कोरोनाचा संसर्ग खालावलेला आहे. बाधितांचा (Coronavirus) आकडा कमी झाल्याने देशात एक चांगलं वातावरण आहे. मागील 24 तासात 18,346 कोरोनाचे बाधित रुग्ण सापडले आहेत. तर मागील तीन महिन्यामधील हा आकडा सर्वात कमी आहे. तसेच, 2020 च्या तुलनेत यंदा बाधितांची संख्या कमी आहे. दरम्यान, कोरोना संसर्ग प्रमाण घटत असल्याने नागरिक गाफील राहिले तर देशाच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ होऊ शकते, अशी शक्यता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात ICMR ने व्यक्त केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

‘रिव्हेंज ट्रॅव्हल’मुळे भारताला कोरोना (Coronavirus) संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर येऊ शकतो. यावरुन आणखी एकदा लाॅकडाऊनची (Lockdown) आवश्यकता निर्माण होऊ शकते. असं आयसीएमआर आणि लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजच्या संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासानुसार सागितलं आहे. तर, विशेष म्हणजे एकतर भारतात कोरोनाचे प्रमाण घटत आहे. त्यामुळे लॉकडाऊन पुर्ण उठवण्यात आलं आहे. अशातच दुसरीकडे वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील 61 गावात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे तेथील जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, येत्या काही महिन्यांत लोक फिरण्याची संधी साधू शकतात. यामुळेच विमान तिकीटं आणि हॉटेलचं बुकींग मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून येतंय. या पार्श्वभूमीवर, पर्यटकांशिवाय स्थानिक रहिवासी आणि प्रशासनाला आपली जबाबदारी वेळीच ओळखावी लागेल. तर आगामी फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान कोरोना संक्रमणाच्या आकड्यांत पुन्हा एकदा वाढ दिसून येऊ शकते. असं ICMR ने म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

त्याचबरोबर देशांतर्गत पर्यटनाचा कोरोना (Coronavirus) संक्रमणावर परिणाम अभ्यासण्यासाठी एक मॉडल तयार करण्यात आलं आहेच.
यानुसार, पर्यटनांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हिमाचल प्रदेशसारख्या राज्यांत कोरोना संक्रमण फैलावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, नागरिकांना पर्यटनासाठी देण्यात आलेली सूट तिसरी लाट उद्भवण्यासाठी पुरेशी असल्याचं संशोधकांची माहिती आहे.
सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक आयोजनांमुळे ही तिसरी लाट आणखीन घातक होऊ शकते.असा इसारा तज्ञाकडून देण्यात आला आहे.

Web Title :- Coronavirus | Strict lockdown is inevitable once again if you act irresponsibly – ICMR

हे देखील वाचा :

Pune Crime | पोलिसांचा जुगार अड्यावर छापा, जुगार खेळणाऱ्या 5 जणांना रंगेहात पकडले

Parbhani News | कर्ज मंजूर आणि वितरणास विलंब ! शेतकर्‍यांचे ‘त्या’ बँकेच्या विरोधात उपोषण

Shiba Inu Coin | 24 तासात ‘या’ क्रिप्टोकरन्सीमध्ये आली 45 टक्क्यांची ‘उच्चांकी’, जाणून घ्या कारण

Related Posts