IMPIMP

Coronavirus | कोरोना विषाणूवरील प्रभावी 2 नव्या औषधांच्या वापराला WHO ची मंजूरी

by nagesh
Coronavirus | two new drugs for corona world health organisation who approval

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Coronavirus | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने (Coronavirus) जगात धुमाकूळ घातला आहे. दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) कोरोना विषाणूसाठी उपयुक्त असणाऱ्या नवीन औषधांना (Medicines) आज (शुक्रवारी) मंजूरी देण्यात आली आहे. ही औषधे कोरोना बाधित व्यक्तींवर उपचारासाठी प्रभावी असल्याचं निष्पन्न झालं आहे. या दोन औषधांविषयी सविस्तर जाणून घ्या.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दैनंदिन कोरोना बाधितांची (Coronavirus) संख्या वाढत आहे. दरम्यान लोकांना दिलासा देणारी माहिती आता समोर आली आहे. कॉर्टिकोस्टिरॉईड्ससह वापरले जाणारे संधिवात औषध बॅरिसिटिनिब गंभीर किंवा गंभीर कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी प्रभावी असल्याचे निष्पन्न झालं आहे. तर, या औषधांमुळे रुग्णांच्या जगण्याची शक्यता वाढली असून कोरोना बाधितांसाठी व्हेंटिलेटरची गरज कमी झाली आहे. असं WHO च्या तज्ञांकडून सांगण्यात आलं आहे.

संधिवाताचे औषध बॅरिसिटिनिब, कॉर्टिकोस्टिरॉईड्स या दोन्ही औषधांचा वापर गंभीर कोरोना रूग्णांवर उपचारासाठी करण्यात आला, त्यामुळे रुग्णांचे जगण्याचे प्रमाण वाढले आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता देखील कमी झाली आहे. तज्ज्ञांनी कमी गंभीर कोरोना रुग्णांसाठी सिंथेटिक अँटीबॉडी सोट्रोविमॅबची शिफारसही केली आहे. ज्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा धोका अधिक आहे. त्यांच्यासाठी हे प्रभावी आहे. यात वृद्ध, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) अथवा मधुमेहासारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांचा समावेश असल्याचं WHO च्या तज्ञांनी सांगितलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, WHO च्या माहितीनूसार, सप्टेंबर 2020 पासून WHO ने गंभीर आजारी रूग्णांसाठी कॉर्टिकोस्टिरॉईड्ससह केवळ ४ औषधांना मान्यता दिलीय.
कॉर्टिकोस्टिरॉईड्स स्वस्त आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.
टोसिलिझुमॅब आणि सेरिलुमॅब ही संधिरोग औषधे, ज्यांना जुलैमध्ये मान्यता दिली होती.
सप्टेंबरच्या सुरुवातीला सिंथेटिक अँटीबॉडी उपचार रेजेनेरॉनला मान्यता दिली आहे.

Web Title :- Coronavirus | two new drugs for corona world health organisation who approval

हे देखील वाचा :

Sugar Patients Diet | ’शुगर फ्री’ आहेत ‘ही’ 5 फळे आणि भाज्या, तज्ज्ञांनी डायबिटीज रूग्णांना दिला खाण्याचा सल्ला

What To Do In Home Isolation | होम आयसोलेशनमध्ये उपचार करत आहात का ? कधीही करू नका ‘या’ चूका

MNS | मराठी पाट्यांबाबत मनसेचा व्यापाऱ्यांना इशारा; जाणून घ्या मनसेची भूमिका

Related Posts