IMPIMP

Corporator Pramod Bhangire | …तर कुणाची गय केली जणार नाही, नगरसेवक प्रमोद भानगिरे यांचा इशारा

by nagesh
Corporator Pramod Bhangire News

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Corporator Pramod Bhangire | विकास कामा मध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर गय केली जाणार नाही.
याआधी मी शांत होतो, पण आता शांत बसणार नाही. कोणी आडवं आले तर त्याला आडवे केल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना
नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे (Corporator Pramod Bhangire) यांनी विरोधकांना दिला आहे. प्रभाग क्रमांक 26 मध्ये केलेल्या विकास कामांचा
लोकार्पण सोहळा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Former MP Shivajirao Adhalrao Patil) यांच्या हस्ते झाला. त्यावेळी नगरसेवक
प्रमोद भानगिरे (Corporator Pramod Bhangire ) बोलत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

प्रभाग क्र. 26 मध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेचे (Pune Municipal Corporation) नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे (Corporator Pramod Bhangire) यांच्या प्रयत्नातून शाहिद सौरभ फराटे (Saurabh Farate) चौक तसेच अहिल्याबाई होळकर चौक (Ahilyabai Holkar Chowk) यादरम्यानचे सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा माजी खासदार शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, प्रभाग क्र 26 मधील पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवणार असल्याचे सुचक वक्तव्य त्यांनी केले. यामध्ये काळेपडळ व हंडेवाडी रोडच्या पाणी टंचाईवर ज्यांनी राजकारण केले त्यानां सूचक इशारा दिला. येणाऱ्या 15 फेब्रुवारी पर्यंत आपला प्रभाग पाणी टंचाई मुक्त होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच प्रभाग क्र 26 स्मार्ट प्रभाग होत आहे, या पुढच्या काळात तुम्ही असेच शिवसेनेच्या (Shivsena) पाठीशी उभे राहाल अशी आशा आढळराव पाटील यांनी व्यक्त करुन पुणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.

यावेळी राजेंद्र बाबर यांनी आभार व्यक्त केले. या प्रसंगी शिवसेना पक्षाचे विजय देशमुख, राजेंद्र बाबर, देवेंद्र भाट, अभिमन्यू भानगिरे, इम्तियाज शेख, उल्हास तुपे, संजय संपकाळ, सचिन तरवडे, गौरव गायकवाड, मनीषा डाळींबकर,वैशाली काळे, नूरजहाँ मुल्ला, विद्या होडे,वर्षाराणी फरांदे, जानमोहम्मद शेख, प्रवीण हिलगे, नाना बारगुळे, संतोष जाधव, विश्वास पोळ, जाधव, कमांडर जयंत ढोपे, सर्व सोसायटी चे नागरिक काळेपडळ भागातील सर्व नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title: Corporator Pramod Bhangire News

हे देखील वाचा :

Sharad Pawar | अखेर शरद पवारांना ‘कोरोना’नं गाठलं, तिसर्‍या लाटेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा Positive

Long Covid Signs | लाँग कोविडची अशी 5 लक्षणे ज्यांच्याकडे नेहमी केले जाते दुर्लक्ष ! जाणून घ्या

Riya Sen | वादविवादानं लावलं ‘या’ सुपरहिट अभिनेत्रीच्या करिअरला ग्रहण, ‘या’ अभिनेत्या सोबतचा MMS झाला होता लिक

Related Posts