IMPIMP

Covid Vaccination Certificate | लसीकरण प्रमाणपत्रावर कोणाच्या सांगण्यावरुन PM मोदींचा फोटो? जाणून घ्या RTI मधून मिळालेलं उत्तर

by nagesh
Covid Vaccination Certificate | who decided use pm narendra modi photo covid vaccination certificate rti reveals know the answer

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात आलेली कोरोनाची (Corona) दुसरी लाट ओसरत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज 4 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. परंतु त्यानंतर रुग्ण वाढीचा हा आलेख खाली आला. सध्याच्या घडीला देशातील परिस्थिती नियंत्रणात आहे. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात असल्याने कोरोना संसर्गाला ब्रेक लागला आहे. मात्र, लसीकरण प्रमाणपत्रावरील (Covid Vaccination Certificate) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला (PM Narendra Modi Photo) आजही आक्षेप घेतला जात आहे. कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर (Covid Vaccination Certificate) मोदींचा फोटो छापण्याचा निर्णय कोणी घेतला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर माहिती अधिकारातून (RTI) समोर आलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.
भारतात देखील कराच्या पैशातून लसीकरण होत आहे. असे असताना भारतात (India) लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो छापण्याची गरज काय, असा सवाल विरोधकांनी सरकारला केला. यावरुन सरकराला (government) संसदेत स्पष्टीकरण द्यावं लागलं.
कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर (Covid Vaccination Certificate) मोदींचा फोटो छापण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला.
याची माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकारी कायद्याच्या अंतर्गत अर्ज दाखल करण्यात आला. त्या अर्जाला प्रशासनाने उत्तर दिले आहे.

कोरोना प्रतिबंधक लस टोचल्यानंतर दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्याचा निर्णय भारत सरकारकडून (Government of India) घेण्यात आला.
कोविड लसीकरण मोहिम (Covid vaccination campaign) सुरु होण्यापूर्वीच हा निर्णय घेतला गेला.
ज्या राज्यात निवडणूक (Election) आहे त्या ठिकाणी प्रमाणपत्रासाठी कोणतं धोरण स्वीकारण्यात आले.
यावर निवडणूक आचारसंहिता (Code of Conduct) लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयानं त्या त्या राज्यांमधील प्रमाणपत्रांवर फिल्टर्स लावले.
त्यामुळे निवडणुकीच्या दिवसांमध्ये जारी करण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो नव्हता.
निवडणूक संपल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ववत करण्यात आली आणि मोदींचा फोटो प्रमाणपत्रावर छापला जाऊ लागला, असं उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले.

Web Title : Covid Vaccination Certificate | who decided use pm narendra modi photo covid vaccination certificate rti reveals know the answer

हे देखील वाचा :

Mahadev Jankar | ‘गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही’

WhatsApp | व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅट आता राहील सुरक्षित, असे ऑन करू शकता एंड-टू-एंड इनक्रिप्शन फीचर

PM-Kisan | कोट्यवधी लोकांचे नशीब उजळले, आता दरमहिना मिळतील इतके हजार रुपये; ताबडतोब जाणून घ्या प्रक्रिया

Related Posts