IMPIMP

CP Krishna Prakash | पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची धडक कारवाई ! तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि हप्ता वसुल करणाऱ्या कर्मचाऱ्याची केली उचलबांगडी

by nagesh
CP Krishna Prakash | Action taken by Commissioner of Police IPS Krishna Prakash!senior police inspector who ignored the complaint attached to control room and an employee who collected the installment

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये (PCMC) माथाडी कामगारांच्या (Mathadi Workers) नावाखाली अनेक गैरप्रकार करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash) यांनी दिले आहेत. याशिवाय उद्योजक, नागरिक यांनी याबाबत तक्रार देण्यास पुढे यावे असे आवाहन केले होते. त्यानुसार माथाडी संघटनांच्या (Mathadi Organizations) विरोधात तक्रार करण्यात आली होती. परंतु त्या तक्रार अर्जाकडे दुर्लक्ष (Ignore Application) केल्याचे समोर आले आहे. या कारणावरुन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash) यांनी थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर (Senior Police Inspector) कारवाईचा (Action) बडगा उगारला आहे. तक्रार अर्जाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकास तडकाफडकी नियंत्रण कक्षाशी संलग्न (Attached Control Room) करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. (IPS Krishna Prakash)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे (MIDC Bhosari Police Station) वरिष्ठ पोलीस निरिक्षक शिवाजी गवारे (Shivaji Gaware) असे नियंत्रण कक्षाशी संलग्न केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पिंपरी चिंचवड शहरातील एमआयडीसीच्या काही भागात माथाडी संघटनामध्ये धुसफूस आहे. या संघटनां कंपन्यांना ब्लॅकमेल (Blackmail) करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. या तक्रारींची योग्यवेळी दखल घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash) यांनी दिल्या होत्या.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात माथाडी संघटनेच्या विरोधात तक्रार अर्ज करण्यात आला होता. या तक्रार अर्जाकडे पोलीस निरिक्षक शिवाजी गवारे यांनी दुर्लक्ष केले. तक्रार अर्जाकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरुन त्यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले.

हप्ता घेणारा पोलीस नियंत्रण काक्षाशी संलग्न

दरम्यान, हप्ता वसुली (Recovery) करणे एका पोलीस कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. वाकड वाहतूक विभागात (Wakad Traffic Department) कार्यरत असणाऱ्या सचिन खोपकर (Sachin Khopkar) हा पोलीस कर्मचारी खासगी बस चालकांकडून हप्ता वसुल करत असल्याची तक्रार करण्यात आली होती.
प्राप्त तक्रारीची खातरजमा केल्यानंतर यामध्ये तथ्य आढळून आले.
त्यामुळे पोलीस आयुक्तांनी सचिन खोपकर या पोलीस कर्मचाऱ्याला देखील नियंत्रण कक्षाशी संलग्न केले आहे.

Web Title :- CP Krishna Prakash | Action taken by Commissioner of Police IPS Krishna Prakash!senior police inspector who ignored the complaint attached to control room and an employee who collected the installment

हे देखील वाचा :

Pune Crime | HDFC बँकेत अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाची 12 लाखांची फसवणूक, 2 महिलांसह तिघांवर FIR

Pune Crime | ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, अल्पवयीन मुलीने नकार देताच….; सराईत गुन्हेगार गजाआड

Nitin Raut | महावितरणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर ऊर्जामंत्र्यांचा कारवाईचा बडगा; उपसंचालक सुमित कुमार निलंबित

Related Posts