IMPIMP

CP Sanjay Pandey On POCSO Act | ‘पोक्सो’बाबतचा ‘तो’ आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी अखेर घेतला मागे

by nagesh
CP Sanjay Pandey On POCSO Act that order regarding pokso was finally withdrawn by mumbai commissioner of police sanjay pandey

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – CP Sanjay Pandey On POCSO Act | पोक्सो कायद्याचा अनेकदा गैरवापर करून आपसातील वैयक्तिक वैमनस्यातून या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जातो. अशा प्रकरणात, यंत्रणेकडून तपास व्यवस्थित करण्यात आला नाही तर संबंधित व्यक्तीला मानसिक त्रास भोगावा लागतो. असे प्रकार घडत असल्याने मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai CP Sanjay Pandey) यांनी पोक्सोबाबत (CP Sanjay Pandey On POCSO Act) काही आदेश दिले होते. मात्र, स्वयंसेवी संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतल्याने हे आदेश मागे घेण्यात आले आहेत.

स्वयंसेवी संघटनांनी यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर बाल हक्क संरक्षण आयोगाने (Child Rights Protection Commission) दोन दिवसात ते आदेश मागे घेण्यात यावेत, असे पत्र आयुक्त संजय पांडे यांना पाठवले होते. याची दखल घेत अखेर पांडे यांना हे आदेश मागे घ्यावे लागले आहेत.

त्या वादग्रस्त आदेशात काय म्हटले होते…

विनयभंग (Molestation Case) व पॉक्सो कायद्याअंतर्गत (POCSO Act) गुन्हा नोंदवण्यासाठी सहायक पोलीस आयुक्तांची (ACP)
शिफारस असावी.

तसेच पोलीस उपायुक्तांची (DCP) परवानगी घेणे बंधनकारक आहे.

पोक्सोसंदर्भात तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी (Senior Police Inspector) सहायक आयुक्त (Assistant Commissioner) तसेच उपायुक्तांशी दूरध्वनीवर संपर्क साधून शहानिशा करीत त्वरित गुन्हा दाखल करावा.

अटक आरोपीला अटक करण्यापूर्वी सहायक आयुक्तांचे योग्य आदेश घ्यावेत.

Web Title :- CP Sanjay Pandey On POCSO Act | that order regarding pokso was finally withdrawn by mumbai
commissioner of police sanjay pandey

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :


Related Posts