IMPIMP

सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण

by bali123
Pune-Pimpri Corona Updates | Great relief to Punekar, Pimpri-Chinchwadkar! More than 13,000 corona-free patients a day

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – सध्या राज्यात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. बॉलीवूडनंतर आता क्रिकेटपटूंना कोरोना झाला आहे. या आगोदर भारतीय क्रिकेट टीममधील सचिन तेंडुलकर, इरफान पठाण, यूसूफ पठाण आणि एस. बद्रीनाथ या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता भारतीय महिला टी – २०ची कर्णधार हरमनप्रीत कौर harmanpreet kaur हिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नुकत्याच इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे मालिका झाली होती. त्यामध्ये हरमनप्रीत कौर हिला दुखापत झाली होती. यानंतर ती टी २० मालिका खेळू शकली नव्हती.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

हरमनप्रीत कौर harmanpreet kaur हिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येताच तिने स्वतःला क्वारंटाईन केले आहे. हरमनप्रीत कौर गेल्या ४ दिवसांपासून आजारी होती. तिच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. हरमनप्रीत कौरची भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेच्या दरम्यान कोरोना चाचणी करण्यात आली होती. तेव्हा तिला कोरोना नव्हता. या मालिकेनंतर तिला कोरोनाची लागण झाली होती अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारताचा वन-डे आणि टी-२० मालिकेत पराभव केला होता. या मालिकेत हरमनप्रीतने harmanpreet kaur एक अर्धशतक झळकावले होते.

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

आयपीएलवरही कोरोनाचे संकट
भारत आणि इंग्लंड सीरिजमध्ये कॉमेंट्री करणाऱ्या इरफान पठाणलासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. इरफान पठाण नुकत्याच पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळताना दिसला होता. तसेच इरफान पठाणने भारत-इंग्लंड मालिकेच्या दरम्यान स्टार स्पोर्ट्सवर एक कार्यक्रमदेखील केला होता. या कार्यक्रमानंतर इरफान पठाण कोणाच्या संपर्कात आला ? तसेच आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणाऱ्यांचा यात समावेश आहे का? याबाबतीत अजून कोणतीच माहिती समजू शकलेली नाही. जर इरफान पठाण अजून कोणाच्या संपर्कात आला असेल तर आयपीएलवर संकट ओढवण्याची शक्यता आहे.

Also Read:

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

भाजप नगरसेविकेच्या मुलाची आत्महत्या, तपास सुरु

लस घेऊनही शेकापचे आमदार जयंत पाटील ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

राष्ट्रवादीसोबत जाणार का ?, त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात…

Related Posts