IMPIMP

Crime News | धक्कादायक ! लष्कराच्या 3 जवानांकडून विवाहित महिलेवर सामुहिक बलात्कार; व्हिडिओ बनवून दिली धमकी

by nagesh
Crime News | 3 soldiers of army gangrape married woman also made porn video News Delhi News

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Crime News | देशाची राजधानी नवी दिल्लीतून (New Delhi News) एक संतापजनक घटना (Crime News) उघडकीस आली आहे. नौदल आणि लष्कराच्या तीन जवानांनी विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पिडित महिलेनं दिल्ली पोलिसांकडे (Delhi Police) तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून दिल्ली पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत माहिती अशी की, महिला तिच्या घराजवळील एका पार्कमध्ये फिरत होती, त्यावेळी शेजारी राहणारा 1 आरोपी तेथे पोहोचला आणि कुटुंबाला भेटण्याच्या बहाण्यानं घरी येण्यास सांगितले. पीडितेने नकार दिल्यानंतरही आरोपीनं तिला जबरदस्ती करत घरी घेऊन गेला. त्याचा एक मित्र घरी आधीच हजर होता. दोघांनी महिलेवर बलात्कार (Gang Rape) केला आणि व्हिडिओही बनवला. याबाबत कोणाला सांगितल्यास हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होईल. अशी धमकीही त्यांनी दिली. यानंतर महिला तिच्या घरी गेली. (Crime News)

2 महिन्यांनंतर पीडिता काही कामानिमित्त घराबाहेर पडली होती, आरोपीने तिला पुन्हा एकदा पकडून मुनिरका येथे नेले आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. येथे त्याने आधी एका घरात नेऊन स्वत: बलात्कार केला आणि त्यानंतर मित्रालाही बोलावलं मित्रानंही पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर महिला पतीसह गावी परतली. नंतर दिल्लीला येण्यास नकार दिला. पतीने कारण विचारले असता. महिलेने घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर पतीनं तिला पोलिसांत तक्रार करण्यास सांगितलं. यानंतर महिलेनं तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, आरोपींपैकी एक नौदलात तर दोन लष्करात आहेत. सध्या आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, आता आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पीडितेच्या वकिलांनी सांगितलं.

Web Title : Crime News | 3 soldiers of army gangrape married woman also made porn video News Delhi News

हे देखील वाचा :

Rajesh Tope | ‘राज्यात मास्क मुक्ती होणार का?’ राजेश टोपे म्हणाले…

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 55 जणांवर कारवाई

Diabetes | ‘मधुमेह’च्या रूग्णांसाठी अतिशय लाभदायक आहे अश्वगंधा, जाणून घ्या कशी करते शुगर कंट्रोल

SBI Debit Card Pin And Green Pin | ‘एसबीआय’च्या खातेधारकांसाठी दिलासा ! आता ‘या’ सोप्या पद्धतीने घरबसल्या जनरेट करू शकता डेबिट कार्ड PIN व ग्रीन पिन

Related Posts