IMPIMP

Crime News | धक्कादायक ! पतीने पसंतीचा शर्ट शिवला नाही म्हणून पत्नीने गळफास घेऊन संपवलं जीवन

by nagesh
Crime News | husband did not sew shirt of her choice angry wife do suicide in kota of rajasthan

राजस्थान : वृत्तसंस्था Crime News | राजस्थानच्या कोटा शहरातील (Rajasthan) आमरकेपुरम येथील एक धक्कादायक (Crime News) घटना उघडकीस आली आहे. पतीने आपल्या पसंतीचा शर्ट शिवला नाही म्हणून संतप्त पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. 23 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंजली सुमन (Anjali Suman) असं त्या
महिलेचं नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, त्या मृत महिलेचा विवाह दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील मंदसौर येथे राहणाऱ्या शुभमसोबत (Shubham) झाला होता. शुभम कोटा येथे एका खासगी कंपनीत काम करतो. बुधवारी सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी शुभम आणि अंजली यांच्यात वाद झाला. पत्नीने आपल्या पसंतीचा शर्ट पतीला शिवण्याचा आग्रह धरला. त्यावरून दोघांमध्ये जोरात भांडण झाले. पती जेवण न करता घरातून बाहेर पडला. यानंतर अंजलीने घरातच गळफास (Crime News) घेतला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, पती शुभमने अशी माहिती दिली की, मंगळवारी पत्नीने त्याला त्याच्या आवडीचा शर्ट शिवायला सांगितले होते. पण यावरून आम्हा दोघांमध्ये वाद झाला. यानंतर मी जेवण न करता दुचाकीने कामावर गेलो. ऑफिसमध्ये असताना पत्नीचा एकदा फोन आला. तिला माझ्याशी बोलायचे होते. पण मी कामात असल्याने घरी आल्यावर बोलतो, असे सांगितले. पण काही वेळानंतर शेजा-यांचा फोन आला आणि त्यांनी अंजली ने आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती (Crime News) दिली.

दरम्यान, वैद्यकीय मंडळाने शवविच्छेदन केले आहे. यानंतर बुधवारी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल.
याप्रकरणी अंजलीच्या माहेरच्या लोकांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पुढील तपास पोलिस (Police) करीत आहेत.

Web Title: Crime News | husband did not sew shirt of her choice angry wife do suicide in kota of rajasthan

हे देखील वाचा :

Gratuity Funds | PF खात्यावर आता किती मिळेल व्याज, 1 ऑक्टोबरपासून आले नवीन रेट; जाणून घ्या

Cryptocurrency | 500 रुपयांत सुद्धा Bitcoin मध्ये करू शकता खरेदी, विक्रमी स्तरावर आहे दर

Nitin Gadkari | फडणवीस यांच्याबद्दल वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यावर नितीन गडकरींचा खुलासा, म्हणाले…

Related Posts