IMPIMP

Cryptocurrency Bill 2021 | भारतात सर्व खासगी क्रिप्टोकरन्सीवर प्रतिबंध ! मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात संसदेत सादर करणार क्रिप्टोकरन्सीसह 26 बिले (विधेयके)

by nagesh
Cryptocurrency Bill 2021 | cryptocurrency bill 2021 modi government to introduce regulation of official digital currency bill 2021 in winter session of parliament

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Cryptocurrency Bill 2021 | मोदी सरकार (Modi Government) 29 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत (lok sabha winter session 2021) 26 नवीन बिले सादर करू शकते. सरकारने लोकसभेत जी नवीन बिले सादर करण्याचे ठरवले आहे, त्यामध्ये क्रिप्टोकरन्सी नियंत्रित करण्याच्या बिलाचा (Cryptocurrency Bill 2021) सुद्धा समावेश आहे.

RBI द्वारे जारी करण्यात येणार्‍या अधिकृत डिजिटल चलनाच्या (Indian Digital Currency) निर्मितीच्या सुविधेसाठी सरकार संसदेत क्रिप्टोकरन्सीवर विधेयक सादर (Crypto Bill 2021) करेल. क्रिप्टो करन्सी संबंधित विधेयकात भारतात सर्व खासगी क्रिप्टोकरन्सीवर प्रतिबंध, परंतु अंतर्गत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी काही अपवादांना परवानगीचा प्रस्ताव असेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पंतप्रधानांनी देशांना केले होते आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 18 नोव्हेंबरला सर्व लोकशाही देशांना मिळून हे ठरवण्यासाठी आव्हान केले होते की,
क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency Bill 2021) चुकीच्या हातात जाऊ देऊ नका, अन्यथा तरूणांचे भविष्य बरबाद होऊ शकते.
त्यांनी डिजिटल क्रांतीमधून समोर येणार्‍या आव्हानांना तोंड देण्यासाठी समान विचाराच्या देशांनी एकत्र येण्यावर जोर दिला.

पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाकडून आयोजित ‘सिडनी संवाद’ला डिजिटल माध्यमातून संबोधित करत म्हटले की,
डाटा ‘नवीन शस्त्र’ बनत आहे आणि हे देशांच्या पसंतीवर अवलंबून असेल की ते तंत्रज्ञानाच्या सर्व साधनांचा वापर सहयोगासाठी करतात की संघर्षासाठी,
बळ वापरून शासनासाठी करतात किंवा पसंतीनुसार, प्रभुत्वासाठी करतात की विकासासाठी.

पीएम मोदी यांनी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency Bill 2021) किंवा बिटकॉईनचे (Bitcon) उदाहरण देत म्हटले की,
हे महत्वाचे आहे की सर्व लोकशाही देशांनी सोबत काम करावे आणि
हे ठरवावे की ते चुकीच्या हातात जाऊ नये, जे आपल्या तरूणांना बरबाद करू शकते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Cryptocurrency Bill 2021 | cryptocurrency bill 2021 modi government to introduce regulation of official digital currency bill 2021 in winter session of parliament

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्याच्या दरात किंचित वाढ पण दर 48 हजारांपेक्षा कमीच, जाणून घ्या आजचा भाव

PV Sindhu | ऑलिम्पिक पदकविजेती पी.व्ही. सिंधू ‘या’ पदासाठी निवडणूक लढवणार

MP Vinay Sahsrabuddhe | भाजप खासदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाले – ‘वडिलांना वचन दिलं म्हणून दुसऱ्याचं मुख्यमंत्रिपद घेतलं’

Related Posts