IMPIMP

CTET Exam Pune | उशिरा आलेल्या परीक्षार्थींनी जबरदस्तीने गेट उघडून केला प्रवेश; रामटेकडी येथील परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ

by nagesh
CTET Exam Pune | Late examinees forcibly opened the gate and entered; Confusion erupted at the examination center at Ramtekdi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनCTET Exam Pune | केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) या परीक्षा केंद्रात उशीरा आलेल्या परीक्षार्थींनी जबरदस्तीने गेट उघडून आत प्रवेश केल्याने आज सकाळी रामटेकडी (Ramtekdi) येथे एकच गोंधळ उडाला. (CTET Exam Pune)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी येथे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा केंद्र (CTET Exam Pune) आहे. या ठिकाणी परीक्षेसाठी केंद्रात प्रवेशासाठी सकाळी साडेसात ते सव्वा नऊ अशी वेळ देण्यात आली होती. याबाबतच्या सूचना हॉल तिकीटावर स्पष्टपणे नोंदविण्यात आल्या होत्या. त्यानुसार सव्वा नऊ वाजता तेथील कर्मचार्‍यांनी गेट बंद केले. त्यानंतर सुमारे ४० परीक्षार्थी उशिरा आले. त्यांनी गेट उघडण्याची मागणी केली. मात्र, कर्मचार्‍यांनी गेट उघडण्यास नकार दिल्याने त्यांच्या वादावादी झाली.

तेव्हा काही जणांनी पुढाकार घेऊन गेट उघडून आत प्रवेश केला. त्यातून परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. याची माहिती मिळाल्यावर वानवडी पोलीस (Wanwadi Police Station) घटनास्थळी दाखल झाले. मात्र, परीक्षार्थींनी माफी मागितल्यास त्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून कोणतीही तक्रार देणार नसल्याचे परीक्षा आयोजकांनी पोलिसांना सांगितले आहे. या सर्व प्रकारात उशिरा आल्याने सुमारे ४० परीक्षार्थींना परीक्षेला मुकावे लागले आहे.

Web Title : CTET Exam Pune | Late examinees forcibly opened the gate and entered; Confusion erupted at the examination center at Ramtekdi

हे देखील वाचा :

Pune Metro | शरद पवार यांचा फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड मनपा मेट्रोने प्रवास

Gold Silver Price Today | सोन्या- चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा लेटेस्ट भाव

Professor N D Patil Passes Away | पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते व विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

Related Posts