IMPIMP

Daily Habits Harm Yours Kidneys | ‘या’ 10 सवयी तुमची किडनी करतील खराब, आजपासूनच सोडून द्या; जाणून घ्या

by nagesh
Kidney Stone | how to remove kidney stone treatment tomato tulsi holy basil juice

सरकारसत्ता ऑनलाइन – Daily Habits Harm Yours Kidneys | 10 मार्च रोजी जगभरात जागतिक किडनी दिन (World Kidney Day 2022) साजरा केला जातो. सालाबादाप्रमाणे यंदा देखील तो साजरा करण्यात आला. लोकांमध्ये या आजाराबाबत जागरूकता निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश आहे. शरीरात किडनीची (Kidney) भूमिका महत्त्वाची असते. ती शरीरातून टाकाऊ पदार्थ (Waste) आणि अतिरिक्त द्रव (Excess Liquid) काढून टाकण्यास मदत करते. पाणी (Water), मीठ (Salt) आणि खनिजे (Minerals) यांचे संतुलन राखण्यासाठी ती अ‍ॅसिड (Acid) बाहेर काढते (Daily Habits Harm Yours Kidneys).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या आरोग्य संतुलनाशिवाय शरीरातील नसा (Nerves), स्नायू (Muscle) आणि इतर ऊती व्यवस्थित काम करू शकत नाहीत. अशा स्थितीत किडनीची काळजी घेणे खूप गरजेचे असते. आपल्या दैनंदिन जीवनातील काही सवयी किडनी खराब करण्याचे काम करतात (10 Habits In Our Daily Life That Damage The Kidneys).

किडनी खराब करण्यास कारणीभूत सवयी (Habits That Cause Kidney Damage)

1. वेदनाशामक औषधांचा अतिवापर (Overuse Of Painkillers) –
नॉन-स्टिरॉईडल अँटी-इंफ्लेमेटरी (Non-Steroidal Anti-inflammatory) औषधे कोणत्याही दुकानात सहज उपलब्ध असतात. ही औषधे वेदना कमी करण्याचे काम करतात. परंतु ती मूत्रपिंडाचे नुकसान (Daily Habits Harm Yours Kidneys) करतात, विशेषतः जर एखाद्याला आधीच किडनीचा आजार (Kidney Disease) असेल. त्यामुळे अशी औषधे जपून वापरावीत.

2. जास्त मीठ वापरणे (Using Too Much Salt) –
ज्या पदार्थांमध्ये मीठ (सोडियम) जास्त असते, ते रक्तदाब वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे किडनीच्या आजाराचा धोकाही वाढतो. जेवणात वरून मीठ (Salt) घालण्याऐवजी तुम्ही फ्लेवर्ड मसाले (Flavored Spices) घालू शकता. असे केल्याने तुम्ही मर्यादित प्रमाणात मीठ वापराल.

3. प्रक्रिया केलेले अन्न खाणे (Eating Processed Food) –
प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये (Processed Food) सोडियम (Sodium) आणि फॉस्फरस (Phosphorus) असते. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्यांनी पॅकबंद अन्न (Packaged Food) खाणे टाळावे. जास्त फॉस्फरस, प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने किडनी आणि हाडांचे नुकसान होऊ शकते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

4. स्वतःला हायड्रेट न ठेवणे (Don’t Keep Yourself Hydrated) –
शरीराला हायड्रेट (Hydrated) ठेवल्याने किडनी शरीरातून सोडियम आणि विषारी पदार्थ (Toxic Substances) काढून टाकण्यास मदत करते. पुरेसे पाणी (Water) प्यायल्याने किडनी स्टोन देखील टाळता येतो. किडनीच्या समस्या असलेल्या लोकांना कमी द्रवपदार्थ (Liquid) घ्यावे लागतात परंतु निरोगी मूत्रपिंड असलेल्या लोकांनी दररोज 3-4 लिटर पाणी प्यावे.

5. पुरेशी झोप न मिळणे (Not Getting Enough Sleep) –
शरीर पूर्णपणे निरोगी ठेवण्यासाठी रात्रीची झोप खूप महत्त्वाची आहे. किडनीचे कार्य झोपण्याच्या चक्राद्वारे नियंत्रित होते.

6. खूप गोड अन्न (Very Sweet Food) –
जास्त गोड खाल्ल्याने लठ्ठपणा (Obesity) येऊ शकतो, ज्यामुळे तुमचा रक्तदाब (Blood Pressure) आणि मधुमेहाचा (Diabetes) धोका वाढतो. या दोन्ही गोष्टी किडनीचे आजार वाढवण्याचे काम करतात. म्हणूनच सामान्य साखरेच्या पदार्थांपासून दूर राहावे.

7. धूम्रपान (Smoking) –
धूम्रपान करणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. जे लोक धूम्रपान करतात त्यांच्या लघवीमध्ये प्रोटीन असण्याची शक्यता असते, जो किडनी खराब होण्याचा संकेत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

8. जास्त दारू पिणे (Drinking Too Much Alcohol) –
दररोज मद्यपान करणार्‍यांमध्ये (दररोज चारपेक्षा जास्त पेग) क्रोनिक किडनी रोगाचा (Chronic Kidney Disease) धोका दुपटीने वाढतो.
त्यामुळे किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी सिगारेट आणि दारूपासून योग्य अंतर ठेवा.

9. पुरेशी अ‍ॅक्टिव्हिटी न करणे (Not Doing Enough Activity) –
जास्त वेळ बसण्याने किडनीचे आजार वाढतात. बैठ्या जीवनशैलीचा किडनीवर वाईट परिणाम होतो.
नियमित अ‍ॅक्टिव्ह लाईफस्टाईल (Active Lifestyle) ब्लडप्रेशर योग्य ठेवते आणि मेटाबॉलिज्म (Metabolism) सुधारते जे किडनीच्या आरोग्यासाठी चांगले असते.


10. खूप जास्त मांसाहार (Too Much Meat) –
अ‍ॅनिमल प्रोटीन (Animal Protein) ब्लड अ‍ॅसिडचे (Blood Acid) प्रमाण वाढवते जे किडनीसाठी हानिकारक आहे.
यामुळे अ‍ॅसिडोसीस (Acidosis) होऊ शकते. अ‍ॅसिडोसीस ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये किडनी अ‍ॅसिड वेगाने काढून टाकू शकत नाही.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Daily Habits Harm Yours Kidneys | daily habits that can harm your kidneys

हे देखील वाचा :

UPI Activated From Aadhaar | आता लवकरच Aadhaar द्वारे करू शकता UPI अ‍ॅक्टिव्हेट, डेबिट कार्डची असणार नाही आवश्यकता

Pune Blood Bank | मधुकर बिडकर रक्तपेढीचे लोकार्पण संपन्न; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘सत्ताधारी नगरसेवकांचे प्रकल्प लोकहिताचे’

Pune City Police | जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिसासाठी घेण्यात आलेल्या ‘टॅलेंट शो’ स्पर्धेत API कल्याणी पाडोळे विजयी

Related Posts