IMPIMP

Damini Lightning App | पुणे जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ अ‍ॅप वापरण्याचे आवाहन

by nagesh
Damini Lightning App | Appeal to use 'Damini' app on behalf of Pune District Administration

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Damini Lightning App | मान्सून कालावधीत (Monsoon Season) विशेषत: जून व जुलै या महिन्यात वीज पडण्याचे प्रमाण लक्षात घेता जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालयाने तयार केलेले “दामिनी ” अ‍ॅप (Damini Lightning App) वापरण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, कृषिसेवक, कोतवाल, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत संगणक परिचालक आणि नागरिकांना अ‍ॅपचा (Damini Lightning App) वापर करावा.

“दामिनी” अ‍ॅप गुगल प्लेस्टोअरवर https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini या लिंकवरुन डाऊनलोड करता येईल. या ॲपमध्ये जीपीएस स्थळाद्वारे वीज पडण्याच्या १५ मिनिटांपूर्वी स्थिती दर्शविण्यात येते. अ‍ॅपमध्ये आपल्या सभोवतालीच्या परिसरात वीज पडण्याची सूचना प्राप्त होताच त्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी स्थालंतरीत व्हावे. यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये.

गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्राप्त सुचनेनुसार गावातील नागरिकांना पूर्वसूचना द्यावी आणि होणारी जीवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे (Resident Deputy Collector Himmat Kharade) यांनी कळविले आहे.

Web Title : Damini Lightning App | Appeal to use ‘Damini’ app on behalf of Pune District Administration

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Remedies For Hair | केसांना दाट बनविण्यापासून ते खाज थांबविण्यापर्यंत करा या गोष्टींचा वापर, जाणून घ्या ‘ब्राह्मी’चे 6 फायदे

Devendra Fadnavis On Thackeray Government | ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘ओबीसी हा भाजपचा डीएनए आणि श्वास’

Pune Crime | पुण्यातील मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर तरुणीसोबत लज्जास्पद प्रकार, नराधमाने चक्क पार्श्वभागावर चापट मारली

7th Pay Commission | कर्मचार्‍यांची किमान बेसिक सॅलरी होईल 26000 रुपये ! फिटमेंट फॅक्टरबाबत नवीन अपडेट, 2 दिवसात येऊ शकतो निर्णय

Ajit Pawar Slams Officers In Satara | अजित पवारांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी; म्हणाले – ‘कुठं फेडाल ही पापं ?, कामं तरी चांगली करत चला’

MHADA Paper Leak Case | म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांकडून आणखी एकाला अटक

Related Posts