IMPIMP

Dasara Melava 2022 | शिंदे गट हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाणार!

by nagesh
Maharashtra Political Crisis | Shiv Sena president Kapil Sibal claims that Uddhav Thackeray is the only candidate till 2023, according to Election Commission documents.

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) शिवाजी पार्कचं मैदान (Shivaji Park Ground) ठाकरे गटाला
देण्याच्या निर्णयाविरुद्ध शिंदे गट (Shinde group) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जाणार असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने
दिली आहे. दसरा मेळाव्याबाबत (Dasara Melava 2022) उद्या पर्यंत याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. हायकोर्टाने (High Court) शिंदे गटाचे
म्हणणे ऐकले नाही. तसेच सदा सरवणकर (Sada Saravankar) यांची याचिका ही आमची शिवसेना (Shivsena) ही खरी शिवसेना असल्याची होती.
सदा सरवणकरांचे म्हणणे हायकोर्टाने ऐकून घेतले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे सूत्रांनी
सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उद्या सुप्रीम कोर्टात करण्यात येणाऱ्या याचिकेत आमची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. त्यामुळे आम्हाला शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा (Dasara Melava 2022) करण्याची परवानगी द्यावी, असे याचिकेत म्हटले आहे. तसेच ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील याचिकेत शिंदे गटाने केली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालाची अंतीम कॉपी हातात आल्यानंतर आज किंवा उद्या याचिका दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी दिली आहे.

आम्ही सुप्रीम कोर्टात पाहू

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आता शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात
आव्हान देणार असल्याचे सांगितले जात आहे.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेता यावा, यासाठी शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात याचिका
दाखल करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यासंदर्भात शिवसेना नेते अनिल परब (Shivsena Leader Anil Parab) यांना विचारले असता,
आम्ही हे सुप्रीम कोर्टात पाहू, तिथेही लढू, असे परब यांनी सांगितले.

Web Title :- Dasara Melava 2022 | cm eknath shinde group likely to petition in supreme court against mumbai hc decision permission of dasara melava to uddhav thackeray on shivaji park

हे देखील वाचा :

Pune PMC News | मागील 2 वर्षांत 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी सर्वाधीक खोदाई करणार्‍या एल ऍन्ड टी (L&T) कंपनीला पुणे महापालिका प्रशासनाचे अभय?

Supreme Court On TV Channels Debates | वृत्त वाहिन्यांवरील ’डिबेट शो’ द्वेष पसरवण्याचे सर्वात मोठे माध्यम; SC कडून सरकारची कानउघडणी, मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार

NCP And Shivsena On Shrikant Eknath Shinde | एक तर हे सरकारच बेकायदा, त्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अजून एक बेकायदा माणूस! शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाईकडून टीका

Related Posts