IMPIMP

Dasara Melava 2022 | दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलिसांचा विशेष प्लॅन, ‘या’ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची केली नियुक्ती

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  – शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळाव्यावरुन (Dasara Melava 2022) शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील राजकीय वातावरण तापले आहे. या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दसरा मेळाव्यातून (Dasara Melava 2022) जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी दोन्ही गटांनी तयारी केली आहे. उद्या (5 ऑक्टोबर) होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत येणार असल्याने मुंबई पोलिसांचा (Mumbai Police) मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था (Law and Order) राखण्यासाठी पोलिसांचा खास बंदोबस्त ठेवला जाणार आहे. यामध्ये वर्षभरात निवृत्त झालेल्या अधिकारी (Retired Officers) आणि कर्मचाऱ्यांची (Employees) नियुक्ती केली जाणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) पोलीस उपायुक्त परिमंडळ यांनी वर्षभरात निवृत्त झालेल्या अधिकारी आणि अंमलदार यांची विशेष पोलीस अधिकारी (Special Police Officer) म्हणून नियुक्ती करावी, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. दसरा मेळाव्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी तयारी सुरु केली आहे. बीकेसी मैदानात (BKC Ground) मुंबई पोलिसांसाठी एक मॉनिटर रुम तयार केली आहे. जवळपास दोन ते अडीच हजार अधिकारी आणि अंमलदारांची नियुक्ती केली जाणार आहे. तर तेवढ्याच संख्येने शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे देखील अधिकारी आणि अंमलदार यांची नियुक्ती केली जाणार आहे.

दसरा मेळाव्यासाठी केवळ मुंबई पोलीसच नाही तर स्पेशल युनिट (Special Unit),
एसआरपीएफच्या टीम्स (SRPF), रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स (Rapid Action Force), एटीएस (ATS) या टीम तैनात
करण्यात येणार आहेत. दोन्ही गटांचा दसरा मेळावा शहरात होणार असून यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार
न होता दोन्ही मेळावे सुरळीत पार पडावेत, यासाठी मुंबई पोलीस सुरक्षेच्या आणि खबरदारीच्या सर्व उपाययोजना करत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, दसरा मेळाव्यातील या भाषणांबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
(Home Minister Devendra Fadnavis) यांनी नेत्यांना इशारा दिला आहे. भाषण करताना कायदा (Law)
मोडला तर कायदा आपलं काम करेल, असे फडणवीस म्हणाले.
तसेच नेत्यांनी कायद्याच्या चौकटी राहून भाषणं करावीत असा सल्ला देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Web Title :- Dasara Melava 2022 | dasara melava 2022 mumbai police special plan for dasara melava appoint officers who retired during the year

हे देखील वाचा :

Shivsena | देशात ‘5 G’ पेक्षा राजकारणाचे ‘हांजी हांजी’ नेटवर्क गतिमान! शिवसेनेचा मोदी-शिंदेंना टोला

Pune Crime | कंपनीत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, युनीट सहाची कामगिरी; 12 गुन्हे उघडकीस

Dasara Melava 2022 | दसरा मेळाव्यावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा, म्हणाले-‘कायदा मोडला तर…’ (व्हिडिओ)

Related Posts