IMPIMP

Datta Bhairat | गोखलेनगर-सेनापती बापट रस्ता ते पंचवटी (पाषाण) बोगदा रद्द करावा; दत्ता बहिरट यांची मागणी

by nagesh
Datta Bhairat | Gokhalenagar Senapati Bapat road to Panchavati (stone) tunnel should be canceled Demand of Datta Bhairat

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनDatta Bhairat | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रस्तावित गोखलेनगर सेनापती बापट रस्ता (Gokhalenagar Senapati Bapat Road) ते पंचवटी (पाषाण) बोगदा (Panchavati Tunnel) आणि पंचवटी (पाषाण) ते कोथरूड बोगदा (Kothrud Tunnel) रद्द करण्यात यावा. अन्यथा गोखलेनगर, जनवाडी, हिरवी चाळ, लाल चाळ, पीएमसी कॉलनी, पाच पांडव सोसायटी व रामोशीवाडी भागातील नागरिकांना (Pune News) न्याय मिळवून देण्यासाठी आणि पर्यावरणाची (Environment) हानी रोखण्यासाठी काँग्रेस पक्ष (Congress), दत्ता बहिरट मित्र परिवार सेवा ट्रस्ट (Datta Bhairat Mitra Parivar Seva Trust) आणि परिसरातील नागरिकांच्यावतीने तीव्र जन आंदोलन (Agitation) करण्यात येईल आणि यासाठी सर्वस्वी पुणे मनपा प्रशासन (PMC Administration) जवाबदार राहील असा इशारा दत्ता बहिरट (Datta Bhairat) यांनी दिला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

निवेदनातील महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे.

1. अनेक नागरिक बेघर होतील आणि रस्त्यावर येतील.
पानशेत पुरानंतर (Panshet Flood) लाखो नागरिक बेघर झाले त्यांचे संसार उध्वस्त झाले त्यातील काहींचे गोखलेनगर, जनवाडी येथे पुनर्वसन करण्यात आले. येथील लोकसंख्या मागील काही काळात झपाट्याने वाढली नियोजित बोगद्यामुळे…

गोखलेनगर (Gokhalenagar), जनवाडी (Janwadi), हिरवी चाळ (Hirvi Chaal), लाल चाळ (Lal Chaal), पीएमसी कॉलनी (PMC Colony), पाच पांडव सोसायटी (Pach Pandav Society) व रामोशीवाडी (Ramoshiwadi) येथील अनेक नागरिकांची घरे रस्ता रुंदीकरणासाठी तोडली जातील व ते बेघर होतील आणि त्यांना पुन्हा रस्त्यावर यावे लागेल त्यांच्यावर पुन्हा विस्थापित होण्याची वेळ यायला नको.

विकासाच्या नावाखाली विस्थापित होण्याची वेळ त्यांचावर आल्यास त्यांच्या रोजी – रोटीचा, रोजगार, व्यवसाय संबधित अनेक प्रश्न निर्माण होतील.

विस्थापित झाल्यास येथील अनेक नागरिकांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल.

2. नियोजित पंचवटी (पाषाण) ते गोखलेनगर सेनापती बापट रस्ता असा बोगदा अस्तित्वात आल्यास गोखलेनगर – जनवाडी भागात…

प्रस्तावित बोगद्याकडे जाणारा रस्ता अत्यंत गजबजलेला असून याहीपेक्षा अधिक वाहतूक सामावून घेणे अशक्य आहे.

– रस्ता रुंदीकरणासाठी अनेक घरे , व्यापारी गाळे पाडावी लागतील यासाठी आमचा विरोध आहे.
तसेच अनावश्यक वाहतुकीचा ताण येईल. वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होईल.
अपघातांचे प्रमाण वाढेल. वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने परिणामत: येथील प्रदूषणात प्रचंड प्रमाणात वाढ होऊन त्याचा सरळसरळ दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

3. बोगद्याची आवश्यकता का व कोणासाठी ?

गोखलेनगर – जनवाडी भागातून पंचवटी भागात कोणाचेही ना काही काम आहे ना कोणी तिकडे सहसा जा-ये करतात, कारण ना तिथे बँक, शाळा, कॉलेज, क्लासेस संबधित कोणाचे काम नाही न तिकडे कोणती व्यापारी आस्थापना आहे कि बाजारपेठ या रस्त्याचा गोखलेनगर, जनवाडी, वडारवाडी भागातील नागरिकांना कोणताही फायदा नाही? असे आहे तर नियोजित बोगदे करण्याने नक्की कोणता हेतू साध्य होणार आहे. अशीच वस्तुस्थिती पंचवटी मधील नागरिकांची आहे त्यांचे जनवाडी, वडारवाडी , गोखलेनगर मध्ये काहीच काम नाही. (Datta Bhairat)

4. पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर होणारी हानी

वेताळ टेकडी (Vetal Tekdi) ही पुणे शहरातीतील (Pune News) एक महत्त्वाचा डोंगर आहे.
पुण्याच्या पश्चिमेला वसलेली ही टेकडी जैवविविधता आणि सौंदर्याच्या दृष्टीने पुणेकरांच्या आकर्षणाचे स्थान बनली आहे तसेच शहराचा श्वास म्हणून ही टेकडी आज वरदान ठरत आहे.
पुणे शहराचा सर्वोच्च बिंदू याच टेकडीवर समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंचीवर आहे.
वेताळ टेकडी चा विस्तार सुमारे साडेदहा चौरस किमी क्षेत्रात आहे. वेताळ टेकडी हे नाव त्या टेकडीवर असलेल्या वेताळबाबाच्या देवळामुळे आले आहे.
एस.एन.डी.टी (SNDT), लॉ कॉलेज रस्ता (Law College Road), सेनापती बापट रस्ता (Senapati Bapat Road), गोखलेनगर, सिम्बायोसिस (Symbiosis), पंचवटी, पत्रकार नगर या भागांमधे टेकडीचा विस्तार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वेताळ टेकडीवर अनेक प्रकारचे वृक्ष

वेताळ टेकडीवरील वन हे शुष्क पानझडी प्रकारचे आहे.
या वनामधे आढळ्णारे वृक्ष उंचीने छोटे-मोठे दोन्ही प्रकारचे आहेत.
तिथे गणेर, मोई आणि सालई या स्थानिक वृक्षांचा समावेश असलेला एक गट आहे.
या वृक्षांच्या सोबतच मेडशिगी, हिवर, पांढरुख, बारतोंडी, पाचुंदा, पळस, पांगारा, सावर, वारस ही झाडेसुद्धा वेताळ टेकडीवर आहेत.
याशिवाय काही परदेशी वृक्ष वन विभागाने इथे लावले आहेत.
या वृक्षांमध्ये प्रामुख्याने सुबाभूळ, निलगिरी, Australian acacia यांचा समावेश होतो.
वृक्षांसोबतच वेताळ टेकडीवर छोट्या वर्षायु वनस्पतींचे प्रमाणही लक्षणीय आहे.
पावसाळ्यानंतर टेकडीवर अनेक सुंदर पुष्पवंत वनस्पती पाहता येतात.
यामध्ये एफिमेरल्स किंवा अशा अल्पजीवी वनस्पतींसुद्धा खूप प्रमाणात आहेत.

वनस्पती शास्त्रज्ञ, वृक्षप्रेमी, निसर्गप्रेमी आणि तज्ञ डॉ. हेमा साने (Dr. Hema Sane) यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेर वृक्षाबाबत विशेष बाब अशी हा वृक्ष कात्रज, वेताळ टेकडी आणि त्यानंतर धुळे येथे आढळतो तसेच सुतारदरा डोंगरावर बिजा नामक वृक्ष आढळतो

मानवी आक्रमणामुळे वेताळ टेकडीच्या जैवविविधतेची गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
शहराची वाढ, निरनिराळ्या कारणांसाठी वृक्षतोड, वन विभागातर्फे लावण्यात आलेले परदेशी वृक्ष या कारणांमुळे वेताळ टेकडीच्या जैवविविधतेत बरेच बदल होत आहेत.
वन विभागाने (Forest Department) लावलेले परदेशी वृक्ष इथल्या नैसर्गिक परिसंस्थेंचे संतुलन बिघडवत आहेत व त्यामुळे मोर, लांडोर, पोपट, ससे, भेकर व इतर वन्यजीव आणि पक्षांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अशातच सदरचे प्रस्तावित दोनही बोगदे वेताळ टेकडी छेदून, फोडून करण्यात येणार आहे.
तज्ञांच्या मते बोगद्यामुळे पुनर्भरण जोडल्या गेल्याने त्याचा थेट परिणाम भूगर्भातील जल साठ्यावर होईल.
वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा मार्ग योजला जात आहे असे म्हंटले जाते. त्यामुळे टेकडीवरील हजारो वृक्ष तोडले जाणार आहेत.
हा बोगदा व रस्ता झाल्यास वेताळ टेकडीचे निसर्गसौंदर्य तर नष्ट होइलच पण इथल्या पर्यावरणालासुद्धा हानी पोहोचेल असा इशारा तज्ञ लोक देत आहेत.
पुण्यात थोड्याच राहिलेल्या हिरव्या जागांपैकी एक असलेली वेताळ टेकडी सुद्धा प्रदुषणाच्या विषारी विळख्यात अडकून आपले अस्तित्त्वच गमावून बसेल अशी भिती आता पर्यावरणप्रेमींना वाटत आहे.

डॉ. सतीश फडके (Dr. Satish Phadke) यांच्या “फ्लोरा ऑफ वेताळ टेकडी” या पुस्तकात त्यांनी लिहिलंय कि, “ सह्याद्रीवर आढळणाऱ्या वनस्पती प्रजाती या टेकडीवर आढळतात म्हणून मी या टेकडीला छोटी सह्याद्री असे नाव दिले आहे.” पुण्याची फुप्फुसे म्हणून जी टेकडी ओळखली जात आहे तिचे विकासाच्या नावाखाली लचके तोडून पुणेकरांना प्रदूषणाच्या खाईत लोटू नये.
यामुळे वन्यजीव आणि पक्षांचा नैसर्गिक अधिवास, भूगर्भातील जल स्त्रोत नष्ट होऊन ही वनराई आणि पुणेकरांचे आरोग्यास धोका होणार आहे म्हणून बोगद्याचा अट्टहास सोडणे उचित राहील.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

5. भूगर्भातील पाणीसाठा धोक्यात येईल

वेताळ टेकडीवरील वन हे शुष्क पानझडी प्रकारचे आहे.
ही वनराई पाऊस सुरु झाला तशी गर्द हिरवी होते हळू हळू पावसाचे प्रमाण कमी होऊन उन्हाळ्यात पूर्ण पानझड झालेली असते.
पावसाळ्यानंतर ही झाडे उन्हाळ्यात भूगर्भात असलेल्या पाण्यामुळे तग धरतात.
प्रस्तावित बोगदा आणि रस्त्यामुळे ही भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही
भविष्यात याचा विपरीत परिणाम होऊन पुण्याचा श्वास व फुप्फुसे असलेल्या वेताळ टेकडीवर होऊन ती वनराई नष्ट होईल.
येथील प्राणी – पक्षी यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल व मानवी वावर वाढल्याने त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येईल.
मुळातच पर्यावरणाला धोका होईल अशा पद्धतीने खोदकाम / बांधकाम टेकडीवर होऊच नये अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

Web Title :- Datta Bhairat | Gokhalenagar Senapati Bapat road to Panchavati (stone) tunnel should be canceled Demand of Datta Bhairat

हे देखील वाचा :

Pune Crime | दुर्दैवी ! शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुणांचा मृत्यू; पुण्याच्या लोणीकाळभोर परिसरातील घटना

HDL Cholesterol Level | न्यूट्रिशनिस्टने सांगितले शरीरात ‘गुड कोलेस्ट्रॉल’ वाढवण्याचे 5 सोपे उपाय, हार्ट अटॅक-स्ट्रोकपासून होईल बचाव

Fish Oil Benefits | वाढत्या वयात हाडांसोबत मेंदूही ठेवायचा असेल निरोगी, तर फिश ऑईल करू शकते तुमची मदत; जाणून घ्या

Related Posts