IMPIMP

DBT Scheme | डीबीटी योजनेत आतापर्यंत गरिबांच्या खात्यात टाकले 25 ट्रिलियन रुपये, मोदी सरकारचा दावा

by nagesh
 DBT Scheme | big success of dbt scheme so far modi government has put 25 trillion rupees in the account of the poor

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – DBT Scheme | डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीमद्वारे गरीबांच्या खात्यात थेट पैसे टाकून विक्रम केल्याचा दावा नरेंद्र मोदी सरकारने केला आहे. या योजनेद्वारे आज 25 ट्रिलियन रुपयांचा आकडा पार केला आहे. दरवर्षी नवे लाभार्थी जोडले जात असल्यामुळे हा आकडा वाढत चालला आहे. 2019-20 मध्ये डीबीटी योजनेअंतर्गत 3 ट्रिलियन रुपये ट्रान्सफर केले होते. न्यूज 18 ने हे वृत्त दिले आहे. (DBT Scheme)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

2020-21 मध्ये हे प्रमाण 5.5 ट्रिलियन रुपयांपर्यंत वाढले. गेल्या आर्थिक वर्षात ही रक्कम 6.3 ट्रिलियन रुपये होती. मागील 6 महिन्यांत गरीबांच्या खात्यात 2.35 ट्रिलियन रुपये जमा केले आहेत. 2014 पासून सुरू झालेल्या डीबीटी योजनेत गेल्या अडीच वर्षांत 56 टक्के रक्कम वळती करण्यात आली. ही योजना आपत्तीच्या वेळी लोकांना मदत पोहोचविण्याचे महत्वाचे साधन बनली आहे. (DBT Scheme)

ही योजना मार्च 2020 च्या कोरोना काळात लोकांची तारणहार बनल्याचा दावा मोदी सरकारने केला होता.
बँक खात्यात थेट सरकारचे पैसे जात होते.
गेल्या आर्थिक वर्षात सुमारे 73 कोटी लोकांनी रोखीने डीबीटी योजनेचा लाभ घेतला,
तर 105 कोटी लोकांनी डीबीटीचा लाभ इतर माध्यमातून घेतला.

डीबीटी योजनेमुळे 2.2 ट्रिलियन रुपये चुकीच्या हातात पडण्यापासून वाचल्याचा दावाही सरकार करत आहे.
53 केंद्रीय मंत्रालयांच्या 319 योजना डीबीटीचा योजनेशी जोडल्या गेल्या आहेत.
यामध्ये एलपीजी पायल योजना, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, सार्वजनिक वितरण व्यवस्था,
खत योजना, पीएम आवास योजना, अनेक शिष्यवृत्ती योजना आणि राष्ट्रीय सामाजिक सहाय्य
यांसारख्या योजनांचा समावेश आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- DBT Scheme | big success of dbt scheme so far modi government has put 25 trillion rupees in the account of the poor

हे देखील वाचा :

Pune Accident | हडपसर-सासवड रोडवर कंटेनर व शिवशाही बसचा भीषण अपघात

Pune Crime | पोलिसाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; विमाननगर परिसरातील घटना

Punit Balan Group | टेनिसपटू अंकिता रैना आणि पुनीत बालन ग्रुपमध्ये सामंजस्य करार

Related Posts