IMPIMP

Death of ST Employee | आंदोलक एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

by nagesh
Death of ST Employee | st strike shocking the death of the st worker in mumbai increased the tension of st strike

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Death of ST Employee | एसटीचे राज्य शासनात (Maharashtra State Government) विलीनीकरण व्हावे म्हणून एसटी कर्मचारी (MSRTC Workers) आझाद मैदानावर आंदोलन (ST Workers Strike) करत होते. त्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. आंदोलक, सरकार आणि पोलीस असा वाद सुरू झाला आहे. आझाद मैदानात असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी मध्यरात्री हुसकावून लावले. पोलिसांच्या या कारवाईचा आंदोलकांनी संताप व्यक्त केला आहे. कारवाई दरम्यान कोल्हापूर – कागल आगारातील (Kolhapur – Kagal Depo) एका कर्मचाऱ्याचा मृत्यू (Death of ST Employee) झाल्याचे समोर आले आहे. महेश लेले (Mahesh Lele) असं या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यातच पोलिसांनी 107 आंदोलकांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करत वकील गुणरत्न सदावर्तेंनाही (Adv Gunaratna Sadavarte) अटक (Arrested) केली. त्यामुळे, कर्मचारी आक्रमक झाले आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास महेश लेले या कर्मचाऱ्याचा मृत्य झाला. दरम्यान, पोलिसांनी कारवाई केली त्यामुळे त्यांचा बीपी वाढला आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. (Death of ST Employee)

शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्यानंतर आंदोलकांना आझाद मैदान (Azad Maidan) खाली करण्याचा सूचना पोलिसांनी केल्या होत्या.
मात्र एसटी कर्मचारी काही बाहेर पडण्यास तयार होत नव्हते.
जो पर्यंत वकील गुणरत्न सदावर्ते सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही बाहेर जाणार नसल्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला.
त्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी या आंदोलकांवर कारवाई करत 250 कर्मचाऱ्यांना मैदानातून बाहेर काढले.
त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात (CSMT Railway Station) बसून ठिय्या देण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली.

Web Title :- Death of ST Employee | st strike shocking the death of the st worker in mumbai increased the tension of st strike

 

हे देखील वाचा :

BJP leader Mohit Kumboj | लाऊडस्पीकरसाठी 5 हजार जणांनी केले अर्ज; कंपनीला दिले कंत्राट ! मोहित कुंबोज म्हणाले…

Tina Datta Stylish Look | स्टाईलिश साडी नेसून टीना दत्तानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

Devendra Fadnavis | ‘सगळ्यांना अडीच वाजताच मेसेज आले अन् पोलिसांना पत्ताच नव्हता, हे खूप मोठं अपयश’ – देवेंद्र फडणवीस

Related Posts