IMPIMP

Deepak Kesarkar | आदित्य ठाकरेंना शिंदे गटाकडून ’समज’; म्हणाले – ‘तुम्ही अजून लहान आहात, आमचा अपमान केलात तर…’

by nagesh
 Aditya Thackeray | the government will collapse two or three months aditya thackeray accusation against shinde group

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनDeepak Kesarkar | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Yuva Sena Chief Aditya Thackeray) यांनी सध्या राज्यभरात शिवसंवाद यात्रा (Shiv Samvad Yatra) काढली असून बंडखोरांवर ते जोरदार हल्ला चढवत आहेत. काल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन आदित्य यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. यानंतर शिंदे गट (Shinde Group) सावध झाला असून आदित्य ठाकरे यांना घेरण्यास सुरूवात केली आहे. आदित्य यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) पुढे सरसावले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषदेत घेऊन आदित्य यांच्यावर टिकास्त्र सोडले. तसेच आमच्या आमदारांच्या सुद्धा भावना भडकू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांच्यासोबत दादा भुसे (Dada Bhuse), संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) आणि संजय राठोड (Sanjay Rathod) उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना केसरकर म्हणाले, तुम्ही अजून लहान आहात आणि प्रादेशिक अस्मिता काय असते हे तुम्हाला ठावूक नाही. त्यामुळे आम्ही हाडाचे शिवसैनिक (Shiv Sainik) असून टीका करताना जरा विचार करुन बोला. केवळ शिवसेनेच्या (Shivsena) तिकीटावरच नाही, तर उमेदवाराची मेहनत आणि कामही असते. उमेदवारांमुळेही पक्षाच्या सीट निवडून येत असतात. कोणत्याही विभागाच्या स्थानिक अस्मितेला आव्हान देऊ नका.

केसरकर म्हणाले, उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) दादा भुसे यांचे स्थान आहे, औरंगाबादेत (Aurangabad) संदीपान भुमरे यांना मानणारे लोक आहेत. तर, यवतमाळमध्ये (Yavatmal) संजय राठोड यांच्या पाठिशी संपूर्ण बंजारा समाज (Banjara Community) आहे. तुम्ही अजून लहान आहात, असे केसरकर म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ते पुढे म्हणाले, प्रादेशिक अस्मिता काय असते याची तुम्हाला कल्पना नाही. इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि जवाहरलाल नेहरुंसारख्यांना (Jawaharlal Nehru) याचा अनुभव आला आहे. इंदिरा गांधींच्या काळात प्रादेशिक अस्मितेला ठेच लागली, तेव्हा दक्षिणेतील काँग्रेसचे (Congress) राज्य गेले. तेव्हा एनटी रामाराव (NT Rama Rao) तिथे उभे राहिले. महाराष्ट्रात सहा विभाग असून प्रत्येकाची स्वतंत्र अस्मिता आहे. आदित्य यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची उदाहरणे घेऊन भाषणे करावीत, असे केसरकर म्हणाले.

केसरकर म्हणाले, आदित्य ठाकरे माझ्यापेक्षा निम्म्यापेक्षा वयाचे आहेत. तरीही ते आले की मीही उठून उभा राहतो.
कारण, तो सन्मान बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना असतो.
राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवा हे आदित्य ठाकरे यांचे आव्हान पोकळ आहे.
कारण, ते कुठला तरी इतिहास सांगत आहे. मी नारायण राणे (Narayan Rane) यांचा अलिकडचा इतिहास सांगतो.
कोणीही त्यांच्या धमक्यांना घाबरत नाहीत. 20 ते 25 टक्के ही पक्षाची मते असतील,
ती राष्ट्रवादीचीही (NCP) असू शकतात. मग, शिवसेनेने (Shivsena) उभा केलेला प्रत्येक माणूस का निवडून आला नाही.

एकनाथ शिंदे यांचे कौतूक करताना केसरकर म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर चला, हजार हजार लोक तिथे असतात.
वाढदिवसाएवढी गर्दी रोज असते. तुमच्याकडचे 50 आमदार असेच निघून का जातात.
आमचा लढा स्वाभीमानासाठी असून शिवसेना वाचावी हाच आमचा हेतू होता.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरुद्ध आमचा लढा सरूच आहे, मग आमच्याविरुद्ध का बोलता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासाठी झालेल्या गर्दीवर टीका करताना केसरकर म्हणाले,
आदित्य ठाकरे यांना खर्‍या शिवसैनिकांची ओळखच कशी असेल, ते भेटेले असतील तर त्यांना खरा आणि खोटा शिवसैनिक माहिती असेल.
उद्या राष्ट्रवादीचा एखादा माणूस आला तरी ते त्याला शिवसैनिकच म्हणणार. माझ्या मनात कितीही आदर असू द्या,
पण मी आमदारांचा प्रवक्ता म्हणून बोलतो. पण, तुम्ही सातत्याने आमच्या आमदारांविरुद्ध बोललात,
तर कधी यांच्या भावना प्रक्षोभित होतील, हे सांगता येत नाही, असा इशारा केसरकर यांनी दिला.

Web Title :- Deepak Kesarkar | aditya thackeray you are still young if you insult us shinde group warns aditya thackeray by deepak kesarkar

हे देखील वाचा :

Pune Crime | शहरातील गुन्हेगारांना पिस्तुल विक्री करणाऱ्या आरोपीला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

Pune Crime | पुण्यातील गुन्हेगार दिनानाथ उर्फ सोन्या पवार व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 89 वी कारवाई

Nana Patole Viral Video | नाना पटोलेंच्या ‘त्या’ व्हायरल झालेल्या व्हिडीओसंदर्भात रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या – ‘संबंधित पिडिता तक्रार…’

Related Posts