IMPIMP

Deepak Kesarkar | दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘युवासेनेचे प्रमुख कालपर्यंत कुठेही दिसत नव्हते, आज मुंबईत दिसत आहेत’

by nagesh
Deepak Kesarkar | cm eknath shinde group spokesperson deepak kesarkar has criticized shiv sena leader aditya thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) झाल्यानंतर माजी मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसंवाद यात्रा (Shivsamvad Yatra) काढली आहे. यामाध्यमातून ते बंडखोर आमदारांच्या (MLA) मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे बंडखोर आमदार आणि खासदारांवर (MP) घणाघाती टीका करत आहेत. यावरुन शिंदे गटाचे प्रवक्ते (Shinde Group Spokesperson) दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. युवासेनेचे प्रमुख कालपर्यंत कुठेही दिसत नव्हते, आज मुंबईत दिसत आहेत, असा टोला दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) लगावला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्यात सर्कस सुरु झाली आहे. गद्दार हा गद्दारच असतो. मूळ शिवसैनिक (Shiv Sainik) इथेच आहे. ज्यांनी गद्दारी केली ते निघून गेले, अशी टीका आदित्य ठाकरेंकडून बंडखोर आमदार आणि खासदारांवर करण्यात येत आहे. मात्र त्यांच्या या विधानावर आणि संवाद यात्रेवरुन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं.

केंद्र आणि राज्याचे चांगले संबंध राहिले पाहिजे. परंतु शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) त्यांच्या विधानामुळे केंद्रासोबतचे संबंध खराब झाले, अशी टीका केसरकर यांनी केली. आज तुम्ही मुंबईत दिसू लागले. युवासेनेचे प्रमुख कालपर्यंत कुठेही दिसत नव्हते. मात्र आता शाखेत फिरु लागलेत, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला. तसेच मी त्यांचा आदर करतो, हेही सांगायला दीपक केसरकर विसरले नाहीत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधताना केसरकर म्हणाले,
उद्धव ठाकरे जनतेला कितीवेळा भेटले ? मंत्रालयात किती वेळा गेले ? असा सवाल दीपक केसरकर यांनी केला.
तसेच आमच्या एकही प्रश्नांची उत्तर त्यांनी दिली नाहीत.
आघाडी तोडा हे आम्ही सांगत होतो, मग कटकारस्थान केलं हे का बोलताय, असंही ते म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Deepak Kesarkar | cm eknath shinde group spokesperson deepak kesarkar has criticized shiv sena leader aditya thackeray

हे देखील वाचा :

Maharashtra Political | शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलाही खिंडार! सोलापुरातील आजी-माजी दोन आमदार भाजपच्या वाटेवर

Weight Loss | वजन कमी करत असाल तर कधीही करू नका ‘या’ 4 चूका, ‘करिना’च्या डायटिशियनकडून जाणून घ्या

Elon Musk | गुगलच्या सह-संस्थापकाची पत्नी निकोल शानाहानसोबतच्या कथित प्रेमप्रकरणावर इलॉन मस्क यांचे स्पष्टीकरण; म्हणाले – काल रात्रीच आम्ही…

Related Posts